शेतात टेंभुर्णी फळाचा रानमेवा मिळाला, पण खाण्यापूर्वी अपेक्षा भंग 😢 | Marathi Village Life Vlog
Автор: Uttam Sumitra Marathi Vlogs
Загружено: 2026-02-19
Просмотров: 69
Описание:
आज शेतात बैल चारत असताना अचानक टेंभुर्णी च्या रानमेव्याची आठवण झाली. लहानपणी आम्ही टेंभुर्णीची फळं खूप आवडीने खायचो आणि त्या झाडापासून थोडाफार पैसा सुद्धा कमवत होतो. म्हणून मी त्या झाडाखाली जाऊन फळं शोधू लागलो. दोन-तीन फळं सापडली, पण जास्त काही मिळालं नाही.
मुलालाही ही नैसर्गिक चव मिळावी म्हणून ती फळं त्याला दिली. पण फळ फोडल्यावर आत किडा निघाला आणि एकही फळ खाण्यायोग्य नव्हतं. ज्या आशेने रानमेवा आणला होता ती इच्छा पूर्ण झाली नाही — अपेक्षा भंग झाला.
या व्हिडिओमध्ये मी टेंभुर्णीच्या झाडाचे काही महत्त्वाचे उपयोग सांगितले आहेत. विशेषतः:
जखम झाल्यास त्यावर याचा पारंपरिक पद्धतीने कसा उपयोग करतात
पावसाळ्यात पायाच्या बोटामध्ये होणाऱ्या चिखल्या ठीक करण्यासाठी गावाकडील जुनी पद्धत
नैसर्गिक रानमेव्याचे पारंपरिक औषधी गुण
ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल, कारण गावाकडच्या जीवनात अशी झाडं औषधासारखीच काम करतात.
या सगळ्या भानगडीत माझे बैल दिसेनासे झाले आणि मग सुरू झाला शेतभर त्यांचा शोध. बैल शोधताना एका दुसऱ्या झाडाखाली गेलो आणि तिथे दोन-तीन वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवली. त्या झाडाखाली आम्ही बनवलेली खास रेसिपी आणि खाण्यापूर्वीच झालेलं नुकसान — ती सगळी गोष्टही या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
असा साधा पण अनुभवांनी भरलेला गावाकडचा दिवस — रानमेवा, बालपणाच्या आठवणी, निराशा, बैलांचा शोध आणि जुन्या घटना!
👉 असेच आमच्या जीवनातील आमचे गावाकडचे जीवन vlog, आमचे खेड्यातील जीवन, आमच्या गावातील घडामोडी, आमचे शेतातील काम, आमचे डेली रुटीन Marathi Village Life vlog अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, 🔔 बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर आणि हाईप करा.
---
📖 English Description:
While grazing my bulls in the field, I remembered the wild fruit of the Tembhurni tree. I found a few fruits under the tree, but unfortunately none were edible due to worms. What started as a joyful childhood memory ended in disappointment.
In this vlog, I also shared traditional uses of the Tembhurni tree in village life:
How it is used for healing wounds
A traditional village method to treat chikhlya (sores) on the toes during the rainy season.
Natural medicinal value of this wild tree
These traditional remedies can be useful in rural life where natural resources play an important role.
During this incident, my bulls went missing, and while searching for them, I shared an old story related to another tree and a special recipe we once made there.
This is a real and emotional Village Life Vlog from rural Maharashtra — full of memories, nature, farming, and simple living.
Subscribe for more Marathi village life vlogs, rural lifestyle, farming routine, and authentic gavakadil jivan experiences.
#VillageLifeVlog #GavakadilJivan #MarathiVlog #MarathiFarming #RuralLifeIndia #Tembhurni #Ranmeva #VillageLifestyle #FarmLife #IndianVillage #NaturalRemedy #MarathiYouTuber #रानमेवा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: