दुसऱ्याच्या शेतात सकाळी का जावं लागलं? मजुरी की मदत? | गावाकडचे सुंदर जीवन 🌾
Автор: Uttam Sumitra Marathi Vlogs
Загружено: 2026-02-22
Просмотров: 31
Описание:
सकाळची थंडी जबरदस्त होती… पण तरीही अचानक दुसऱ्यांच्या शेतात जावं लागलं. पांदण रस्त्याने पुढे दिलेली पायवाट पायवाटेच्या कडेने दिसणारी सुंदर झाडी, पुढे जाताना दिसणारं नैसर्गिक सुंदर वातावरण मन मोहून टाकत होतं. थंडी असली तरी स्वेटर घातला नाही, कारण शेतात सकाळचं काम करताना स्वेटर खराब होण्याची शक्यता असते.
दुसऱ्यांच्या शेतात जाण्यापूर्वी आधी आमच्या शेतातून गेलो. नुकताच उगवणारा सूर्य आणि गव्हाच्या पिकावर पडलेलं तांबडं ऊन – ते दृश्य खूपच सुंदर होतं. आमच्या शेतात गहू छान उगवला होता आणि ते पाहून मन आनंदी झालं.
नंतर राजू पाटलांच्या शेताकडे निघालो. वाट खाचखळग्यांनी भरलेली होती. त्यांच्या शेतात पोहोचलो तेव्हा तिथलाही गहू सकाळच्या उन्हात खुलून दिसत होता. गव्हामधील बुजगावणं तर आणखी आकर्षण वाढवत होतं. लगतच हरभरा खायला आला होता, पण कालच फवारणी केल्यामुळे खाण्याचा मोह असूनही खाऊ शकलो नाही.
तुरीला भरपूर शेंगा लागल्या होत्या. काही तुरी आधीच मोडून भारे बांधून ठेवले होते – ते दृश्यही छान दिसत होतं. मी शेतातील अनेक गोष्टी दाखवत त्याविषयी माहिती दिली. पण शेतमालक राजू पाटील अजून आले नव्हते. इकडे तिकडे पाहिलं, हाका मारल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी त्यांच्या फार्महाऊसकडे गेलो. तिथलं वातावरण, बांधलेले बैल आणि परिसर दाखवत असतानाच अचानक राजू पाटलांचा फोन आला… आणि रेकॉर्डिंग थांबवावी लागली.
अशाच आमच्या खेड्यातील साध्या, सुंदर आणि नैसर्गिक जीवनाचे Vlog पाहण्यासाठी – गावातील संस्कृती, सण-उत्सव आणि आमच्या दैनंदिन आयुष्याचे अनुभव Marathi Village vlog पाहण्यासाठी चॅनल नक्की Subscribe करा 🙏🌾
---
📖 English Description:
It was a very cold village morning, yet I suddenly had to visit another farmer’s field. The narrow rural pathway (paaywat) branching from the mud road, lined with beautiful trees, showcased the true beauty of Indian village life. Walking through this farm pathway surrounded by natural scenery was truly mesmerizing. Even though it was cold, I didn’t wear a sweater because early morning farm work in village life can easily ruin it.
Before heading to the other farm, I passed through our own field. The sunrise with its reddish glow falling on the wheat crop created a breathtaking scene. Our wheat crop was growing beautifully, and it felt satisfying to see it.
Then I moved towards Raju Patil’s farm. The road was uneven and full of small pits. Upon reaching, I saw their wheat shining brightly in the soft morning sunlight. The scarecrow in the field added extra charm to the view. Chickpeas were ready to eat, but since spraying was done the previous day, I resisted the temptation.
The pigeon pea crop was full of pods, and some bundles were already tied. I showed many things around the farm and shared information about them. However, the farm owner, Raju Patil, was nowhere to be seen. I called out to him but got no response.
Finally, I headed towards his farmhouse. While showing the surroundings and the bulls tied there, I suddenly received a call from Raju Patil… and had to stop the recording.
To watch simple, beautiful, and natural village life vlogs from our countryside – including our rural culture, festivals, and daily life experiences in Marathi Village Vlogs – make sure to Subscribe to the channel 🌾🙏
#uttamsumitramarathivlogs
#गावाकडचेजीवन #VillageLife #ShetkariVlog #MarathiVlog #RuralLife #FarmLife #गावाकडचेVlog #शेतकरीजीवन #WheatField #IndianVillage #gavakadchevlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: