मुंबई शिवतर बस, शिवतरची राणी अप्रतिम प्रवास , Mumbai -Khed Shivtar
Автор: shivtarmazegaon
Загружено: 2025-11-29
Просмотров: 543
Описание:
खेड तालुक्यातील शिवतर गावाची सर्वात जुनी , मुंबई शिवतर बस. ही बस फक्त प्रवासाचे साधन नसून ती प्रत्येक गावातल्या व्यक्तीच्या आयुष्यासोबत जोडली गेली आहे , पूर्वी महाड डेपो कडून असलेली ही बस वस्तीला गावात रात्री उशिरा 9.30 पर्यंत यायची , सणावारी रात्री 12 पण वाजत असत . तेव्हा 13.30 वाजता मुंबई सेंट्रल वरून सुटत असे . आता तिची वेळ 11.30 असून ही बस खेड आगारातून व्यवस्थापन केली जाते .
पूर्वी दत्तवाडी येथून ही बस सुटताना जागा अडविण्यासाठी धावपळ होई, काही मंडळी पहाटे रांग लावून तिकिटे घेत . आपल्या नातलगाना सोडायला येताना गाव स्टँडवर जमा होत असे . फोन मोबाईल अशा सोयी नसताना बस मधून गेलेली आपली व्यक्ती कधी येईल याने डोळे भरून येत असत .
महाड येथे 10.30 वाजता पेपर मध्ये किंवा केळीच्या पानात गुंडाळून आणलेल्या भाकरी सुकट , भाजी यांचा एक वेगळा दरवळ गाडीत असे .
या बसच्या अनेक अफाट आठवणी आहेत आपण सर्वांनी शिवथर च्या राणीच्या आपल्या आठवणी कमेंट मध्ये लिहाव्या ही विनंती.@Shivtarmazegaon #shivtar #khed #kokani #msrtc#kokani
#mumbaishivtarbus #mumbaikhed
#vashikhed #travels #chakale #jamage #shivtarkond
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: