Angar Nagar Panchayatच्या 17 जागा बिनविरोध पण एका पदासाठी Rajan Patil यांना Ujwala Thite कशा नडतायत?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-18
Просмотров: 132611
Описание:
#BolBhidu #RajanPatil #UjwalaThite
वेळ पहाटे पाचची. नगर पंचायतीच्या इमारतीसमोर एक गाडी थांबते, गाडीतून एक बाई उतरते. नगरपंचायतीचं कार्यालय उघडलेलं सुद्धा नसतं. साफसफाई सुरु असते आणि अशातच या इमारतीच्या समोर पोलिस यायला सुरुवात होते. पोलिस सुद्धा साधे नाहीत, QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम. अंगात काळा टीशर्ट घातलेले, हातात एके-४७ घेतलेले क्विक रिस्पॉन्स टीमचे पोलिस नगरपंचायतीच्या इमारतीसमोर दाखल होतात. गाडीतून उतरलेली महिला या पोलिसांच्या बंदोबस्तात हळूहळू त्या इमारतीच्या पायऱ्या चढते, एके-४७ घेतलेले पोलिस तिची साथ सोडत नाहीत. या महिलेच्यासोबत फक्त एक जण, या महिलेचा मुलगा. कार्यालय बंद असतं ही महिला परत जायला निघते, तोवर इमारतीबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात झालेला असतो. वेळ सकाळी अकराची. याच अनगर नगर पंचायतीचं कार्यालय.पोलिसांची काळी स्कॉर्पिओ सायरन वाजवत आवारात दाखल होते, पोलिसांच्या गाड्यांचा ताफा असतो, महिला पोलिस असतात, एके-४७ घेतलेले QRT पोलिस असतात.
एका पांढऱ्या गाडीमधून एक महिला उतरते, ८ पोलिस आणि ५५ पोलिस अंमलदारांच्या बंदोबस्तात नगर पंचायतीच्या कार्यालयात जाते आणि नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरते. कार्यालयातून बाहेर पडते तेवढ्याच पोलिस बंदोबस्तात. ड्रामा संपलेला नसतो, दुसरा अंक सुरु झालेला असतो. आणखी एक बातमी सांगते आणि मग स्टोरीला सुरुवात करु. सोलापूरच्या मोहोळमधल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक होणार आहे ती नगराध्यक्ष पदासाठी. प्राजक्ता पाटील विरुद्ध उज्वला थिटे. त्याच उज्वला थिटे ज्यांनी पहाटे पाच वाजता पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला. त्याच उज्वला थिटे ज्यांनी अनगरच्या राजन पाटलांवर दडपशाहीचा आरोप केला. त्याच उज्वला थिटे ज्या अनगरच्या बाहुबलीला एकट्या नडल्या. स्टोरी अनगरच्या ड्राम्याची, बाहुबलीची आणि तिथल्या लोकशाहीची सुद्धा.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: