गाजराचा हलवा मराठी रेसिपी l Gajar Halwa marathi recipe l 🔔👍
Автор: Vijaya kabugade
Загружено: 2026-02-05
Просмотров: 20
Описание:
🌸गाजराचा हलवा मराठी रेसिपी l Gajar Halwa marathi recipe l🔔👍
साहित्य-
• १ किलो गाजर
• पाव किलो साखर
• १ वाटी साईअसलेले दूध
• ६-७ बदाम
• ६-७ काजु
• दोन चमचे तूप
• एक चमचा वेलची पावडर
कृती -
गाजर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणे. गाजराची साल काढून घेणे. साल काढल्यानंतर गाजर किसणीने कीसून घेणे.
गॅस वरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणे. तूप गरम झाले की त्यामध्ये गाजराचा खिस टाकून मध्यम गॅस वरती गाजरचा खिस पाणी आटे पर्यंत भाजून घेणे. पाणी आटत आलेले दिसले की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणे त्यानंतर त्यामध्ये पाव किलो साखर टाकून गाजराचा खिस त्यामध्ये शिजवून देणे त्यामध्येच दूध टाकून घेणे खिस शिजत असताना सतत हलवत राहणे. गाजरचा हलवा शिजत आला की त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेणे आणि पाणी आटवून झालं की गॅस बंद करणे झाला आपला तयार गाजरचा हलवा.
vijaya kabugade
मराठी रेसिपी #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: