मुंबई | हे बाळ उद्धव ठाकरे यांना सोडायलाच तयार नाही
Автор: Zee 24 Taas
Загружено: 2015-04-16
Просмотров: 2002195
Описание:
मुंबई : हा व्हिडीओ १६ एप्रिल २०१५ चा आहे. पण हा व्हिडीओ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर व्हायरल होत आहे, त्यावेळी हे लहान अर्जुन नावाचं लहान बाळ उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नव्हतं. त्याचे आईबाबासमोर असतानाही तो उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नव्हता. यावर त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले, तो शिवसेनेत जाणार आहे. यानंतरही तो त्यांना सोडायला तयार नव्हता, तेव्हा ते उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही त्याला निश्चित ओरडले असाल.
आता लहान मुलांसाठी शिशूसेना काढूयात असंही त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. आपण जाऊया असं त्याचे आईबाबा म्हणाल्यावर, छोट्या अर्जुनने त्यांना टाटा देखील केला होता. अखेर बऱ्याच वेळाने अर्जुन त्याच्या आईबाबांकडे आला आणि उद्धव ठाकरे यांना पुढील कार्यक्रमास जाता आलं, याला कधीतरी घेऊन या असं देखील त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
हा व्हिडीओ जवळजवळ साडेचार वर्षापूर्वीचा आहे. अर्जुन नक्कीच आता मोठा झाला असेल, कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत, हे या छोट्या अर्जुनला माहित असेल, म्हणून तो उद्धव ठाकरे यांना सोडत नव्हता का? असं गंमतीने म्हणता येईल.
Baby does not want to leave Uddhav Thackeray
For more info log on to www.24taas.com
Like us on / zee24taas
Follow us on / zee24taasnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: