Mahashivratri special
Автор: Dr. Ayshwarya Revadkar
Загружено: 2026-02-15
Просмотров: 38
Описание:
तुमचा पण गैरसमज आहे का, की स्त्रियांना टॉक्सिक अल्फा मेल, आवडतात म्हणून?
चला, तर खरं काय ते जाणून घेऊया.
आज महाशिवरात्री निमित्त आपण बोलूया त्या सजग पुरुषाबद्दल, ज्याला स्त्रिया प्रेमाने पूजतात, तो महादेव.
आपण शिवाला एक शक्तिशाली पुरुष, विनाश करणारा देव म्हणून पाहतो, पण तो नेहमी ध्यानस्थ, शांत, स्थिर असतो.
त्याची शक्ती ही वर्चस्व गाजवण्यासाठी नाही. तर ती त्याने जगाच्या कल्याणासाठी वापरली.
त्याने गंगेला सन्मानपूर्वक जटेत स्थान दिलं. त्याने हलाहल विष कंठात धारण केलं, नीलकंठ झाला.
त्याचे सामर्थ्य दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी आहे, इतरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाही.
दुसरी गोष्ट, शिव हा पार्वतीला समानतेने, सन्मानाने वागवतो. नात्यात तिच्या अभिव्यक्तीला तो जागा देतो.
नात्यात समान स्थान आणि स्पेस देणं, हे खरं प्रेम.
तिसरी महत्त्वाची गोष्ट, शिव हा केवळ ‘मर्दानगी’चं प्रतीक नाही.
तो आहे अर्धनारीश्वर. एकाच देहात स्त्री आणि पुरुष तत्त्वांची एकात्मता.
आपण समाजाने तयार केलेल्या “पुरुषत्व” आणि “स्त्रीत्व ” गुणांच्या कृत्रिम विभागणीमध्ये अडकतो.
पण विज्ञान सांगतं, गुणांना लिंग नसतं. सर्व लिंगांमध्ये विविध गुणांचा संगम असतो.
गुणांची ही विभागणी समाजनिर्मित मिथक आहे, आणि शिव त्या मिथकाला खोडून काढतो.
फक्त सामर्थ्य नाही, तर करुणा, प्रेम, शांती सहनशीलता, धैर्य या गुणांनी कोणीही व्यक्ती परिपूर्ण माणूस आणि योग्य जोडीदार बनते.
Alpha male नको.
Conscious male हवा.❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: