Shahi Chicken Dum Biryani Full Recipe | घरगुती संपूर्ण सुगंधित शाही चिकन दम बिरयानी | Eid Biriyani
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2018-12-06
Просмотров: 170938
Описание:
Chicken Dum Biriyani | How To Make Shahi Chicken Biriyani | Homemade Chicken Biriyani | शाही चिकन बिरयानी
साहित्य - ६०० ग्रॅम चिकन, ५०० ग्रॅम बासमती तांदूळ, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ½ वाटी पुदिन्याची पाने, ३/४ हिरव्या मिरच्या, ३ tbl spn आले लसणाची पेस्ट, २०० ग्रॅम दही, ५ tbl spn साजूक तूप, १½ tbl spn लाल मिरची पावडर, १ tea spn हळद, १ tbl spn बिरयानी मसाला, १ वाटी दूध, चिमूटभर केसर, ३० ग्रॅम तळलेले काजू काप, खडा मसाला ( २ बादीयान, १ tea spn शहाजीरे, ८/९ काळीमिरी, ७/८ लवंगा, ३ तेजपत्ता, १" दालचीनी, २ मसाला वेलची, ३ हिरवी वेलची ) आवडीचे फूड कलर्स, चिमूटभर हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, २ वाट्या तळलेला कांदा, एक लिंबाची फोड आणि चवीनुसार मीठ आणि झाकण हवाबंद करण्यासाठी कणकेचा गोळा.
कृती - चिकन स्वच्छ धुवून कोरडे करावे आणि त्यात हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, बिरयानी मसाला, साजूक तूप, १५० ग्रॅम दही, एक वाटी तळलेला कांदा, लिंबाचा रस, आले लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून ३ तास मुरवत ठेवावे.
३ तासानंतर दुधात केसर घोळून घ्यावा. आता बिरयानी भांड्यात तांदळाच्या प्रमाणापेक्षा दुप्पट पाणी घेऊन गरम करावे आणि त्यात खडा मसाला व चवीनुसार मीठ घालून तांदूळ ६०% शिजवावा. तांदूळ शिजल्यानंतर त्याला गाळून घ्यावं.
दोन प्लेट मध्ये प्रत्येकी २ पळ्या इतका भात घेऊन दोन रंगांचा तयार करून घ्यावा. मुरलेलं चिकन एका भांड्यात काढावं. राहिलेल्या मसाल्यात एक वाटी पाणी घालून चिकन मध्ये सोडावं. चिकनचा थर तळाला सर्वत्र पसरवून घ्यावा. आता त्यावर ६०% शिजलेला तांदूळ अर्ध्या प्रमाणात घालावा आणि त्यावर दही, तळलेला कांदा घालावा. आता पुन्हा वर उरलेला सर्व तांदूळ घालावा आणि त्यावर केसर दूध सर्व बाजूने घालावे. वेलची आणि जायफळ पावडर चिमूटभर सर्वबाजूने शिंपडून घ्यावी. वर पुन्हा तळलेला कांदा घालावा. आता शेवटी दोन भागात दोन रंगाचा भात घालावा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व तळलेल्या काजू कापने बिरयाणी सजवून घ्यावी.
आता वर झाकण ठेवून पिठाच्या साहाय्याने झाकण हवाबंद करून घ्यावे. आता बिरयाणी साधारण ५ मिनिटे मोठ्या आचेवर शिजवत ठेवावी आणि ५ मिनिटानंतर भांडं तव्यावर ठेवून ४५ मिनिटे मंद आचेवर हळुवारपणे या बिरयाणीला दम काढावा. ४५ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि लक्षात ठेवायचं आहे याचं झाकण १५ मिनिटांनी उघडून घ्यावे, म्हणजे आतील सुगंध बाहेर जाणार नाहीत. बिरयाणी १५ मिनिटांनी गरमागरम सॅलॅड सोबत वाढावी. धन्यवाद !
#chickenbiriyani #shahichickendumbiriyani #biriyanispecial
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: