गोविंदने जीव दिला, की घेतला?, पोलिसांसमोर पोपटासारखी बोलू लागली पूजा गायकवाड | Pooja Gaikwad
Автор: S PRIME MARATHI
Загружено: 2025-09-13
Просмотров: 84428
Описание:
S PRIME MARATHI
गोविंदने जीव दिला, की घेतला?, पोलिसांसमोर पोपटासारखी बोलू लागली पूजा गायकवाड, उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात मोठे अपडेट
उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एकेकाळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असलेले माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुरुवातीला ही आत्महत्या वाटत असली, तरी आता यामागे घातपाताचा संशय बळावत आहे. पोलिसांच्या हाती नवनवीन माहिती लागल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढत आहे. यानंतर आता जेव्हा पोलिसांनी पूजा गायकवाडची चौकशी सुरू केली आहे त्यानंतर पूजा ही पोपटासारखे बोलू लागले अनेक धक्कादायक खुलासे पूजाने पोलिसांसमोर केल्याचं समोर आलंय...
गोविंद बर्गे, जे प्लॉटिंगच्या व्यवसायात यशस्वी होते, त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडशी झाली. ही ओळख लवकरच मैत्री आणि नंतर प्रेमात बदलली. गोविंद पूजावर मनापासून प्रेम करत होता, पण पूजाचे प्रेम हे केवळ पैशांसाठी होते की काय, असा संशय आता व्यक्त होत आहे. पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असता, तिने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे.
गोविंदने पूजा आणि तिच्या कुटुंबीयांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्याने तिला सोन्याचे दागिने दिले, तिच्या भावासाठी महागडा मोबाईल आणि बुलेट घेतली. तिच्या आईसाठी घर बांधून दिले आणि मावशीसाठी प्लॉट घेतला. याव्यतिरिक्त, नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेतीही खरेदी केली. पूजाच्या सर्व मागण्या तो पूर्ण करत होता, अगदी तिच्यासाठी 8 लाख रुपये खर्च करून कला केंद्रही सुरू करून दिले. मात्र, पूजाच्या अपेक्षा वाढतच गेल्या. वाढदिवसाच्या आधी तिला गेवराईतील घरही तिच्या नावावर करून हवे होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: