तूच माझी आई दत्ता, स्वर - कामिनी, गीत - प्रकाश गिरडकर तळोधी जिल्हा चंद्रपूर (सुपरहीट भजन )
Автор: Prakash Giradkar
Загружено: 2020-09-11
Просмотров: 325142
Описание:
भजनाचे नाव- तूच माझी आई दत्ता तूच माझा बाप
चाल: तुम्ही देवता हो
गायिका- के. कामिनी
गीतकार- प्रकाश उरकुडा गिरडकर
====================================
भजन लैरीक
तूच माझी आई दत्ता, तूच माझा बाप
चुकलं जरा लेकराचं, करिसी तू माफ
न कळत होती चुका न कळत पाप
चुकलं जरा लेकराचं करिसी तू माफ !!धृव.!!
त्रैलोकीचा तू रे राणा, मी बाळ तान्हा
सोडू नको साथ माझी, जुलमी हा जमाना
तुझ्या करुणेची, होऊ दे बरसात
खरा देवरूप तू रे वात्सल्यस्वरूप !!१!!
संकटकाळी दत्ता तू रे येशील धावून
भक्तावरी प्रिती अपुली, देशील दावून
दिव्यशक्ती तुझ्यापाशी, नाही तिला अंत
तिन्ही लोकी गाजे देवा, तुझा प्रताप !!२!!
भक्तिभावे मी तुला, जपलं अंतरी
निभावून नेशील दत्ता, जन्मजन्मांतरी
तूच माझा पाठीराखा, तूची रे आधार
प्रीत असो भक्तावरी, कृपाही अमाप !!३!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: