कोकणातील पारंपारिक गणपती विसर्जन|ganpati visarjan 2025🙏
Автор: kokani_umya
Загружено: 2025-09-06
Просмотров: 3042
Описание:
कोकणात गणपती विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक असे केले जाते. निसर्गाच्या सानिध्यात राहून गावच्या निर्मळ आणि शुद्ध नदी (व्हाळे) मध्ये आरती आणि भजनाच्या सुरात ढोल आणि टाळाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो. गावी कोकणात जास्त करून मूर्ती ही शाडू किवा लाल मातीच्या असतात जेणे करून त्या लगेच पाण्यात विसर्जन होतील अशा कारण आपण बाप्पा ला वाजत-गाजत घरी घेऊन येतो त्यांची मनोभावे पूजा सेवा करतो तसेच त्यांचे विसर्जन सुद्धा चांगले व्यवस्थित होणे अत्यंत गरजेचे आहे. ती फक्त मातीची मूर्ती नसून एक विश्वास आहे भावना आहे. ते व्यवस्थितच विसर्जन होयला हवे. कोकणात आजुन ही बाप्पा चे विसर्जन खंडित स्वरुपात किवा मूर्तीची विटंबना होईल असा होत नाही. कोकणाने अजून आपल्या सर्व प्रथा परंपरा जपल्या आहेत. पारंपरिक गणेश विसर्जन म्हणजे गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित करणे, जी भगवान गणेशाला त्यांच्या कैलास पर्वतावर परत पाठवण्याचे प्रतीक आहे. हे विसर्जन साधारणपणे गणेश चतुर्थीनंतर दीड दिवस, पाच, सात किंवा दहाव्या दिवशी, म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते. विसर्जनापूर्वी मूर्तीची पूजा केली जाते आणि मग 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत, ढोलांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा, मोरया! पुढच्या वर्षी, लवकर या!' या घोषणांनी मूर्तीला निरोप दिला जातो. हे विसर्जन म्हणजे जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टींची सुरुवात करणे असे मानले जाते. थोडक्यात, गणपती विसर्जन हे गणरायाचा निरोप घेण्याची, त्याला पुन्हा येण्यासाठी आमंत्रित करण्याची आणि एक सुंदर आठवण घेऊन जाण्याची पारंपरिक पद्धत आहे.
#minivlog#konkanpremi#kokan#india#love#mumbaicheganpati#viral#vlog#travel#nature#ganeshchaturthi#festival#unity#ganpatibappamorya#god
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: