ज्वारीची इडली | तांदूळ, रवा न वापरता मऊ, स्पंजी जाळीदार ज्वारीची इडली |Jwarichi Idli |Jowar idli |
Автор: Ujvala cooking & baking
Загружено: 2025-07-22
Просмотров: 7152
Описание:
ज्वारीची इडली | तांदूळ, रवा न वापरता मऊ, स्पंजी जाळीदार ज्वारीची इडली |Jwarichi Idli |Jowar idli |
साहित्य
ज्वारी दोन वाट्या
उडदाची डाळ एक वाटी
मेथी दाणे अर्धा चमचा
मुरमुरे एक वाटी
१) ज्वारी स्वच्छ धुऊन त्यातले पाणी निथळून कोरडी करून घ्यावी .
२) कोरडी झालेली ज्वारी मिक्सर मधून ओबडधोबड म्हणजे जाडसर बारीक करावी.
३) जाडसर बारीक झालेले ज्वारी बाउलमध्ये टाकावे, त्यात पाणी टाकून पाच ते सहा तास भिजत घालून ठेवावी.
४) उडदाची डाळ स्वच्छ धुऊन त्यात पाणी टाकून ती सुद्धा पाच ते सहा तास भिजत घालून ठेवावी.
५) भिजत घातलेली ज्वारी आणि उडदाची डाळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी.
६) ज्वारी आणि उडदाच्या डाळी सोबतच मुरमुरे सुद्धा बारीक करून घ्यावे.
७) तयार बॕटर सर्व एकत्र मिक्स करून नऊ ते दहा तासासाठी आमवण्यासाठी ठेवून द्यावे.
८) दहा तासानंतर छान सर्व बेटर तयार होते. त्यातील आवश्यक तेवढ्यात बॅटरमध्ये मीठ टाकून करून घ्यावे. बाकीचे बॅटर फ्रिजमध्ये ठेवून एक दोन दिवसात वापरून टाकावे.
९) इडलीपात्रात पाणी उकळायला ठेवून द्यावे. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच इडली लावून द्यावी.
१०) सर्व तयारी झाल्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा इडलीच्या पिठात टाकून मिक्स करावे आणि साच्यात टाकून इडली लावून द्यावी.
११) फुल गॅस वरती दहा ते अकरा मिनिटे इडली छान वाफवून घ्यावी.
१२) दहा ते अकरा मिनिटांनंतर झाकण काढून इडली झाली की नाही ते चेक करून घ्यावे.
१३) तयार इडली सांबर सोबत किंवा नारळाच्या चटणी सोबत खाण्याचा आनंद घ्यावा.
टिप - इडली करताना अजिबात तांदूळ न वापरल्यामुळे ही इडली डायबेटिक फ्रेंडली आहे. म्हणजेच डायबेटिक असणारे लोक सुद्धा हे इडली अगदी पोटभर खाऊ शकतात. लहान मुलांसाठी सुद्धा हे इडली पौष्टिक आहे त्यामुळे त्यांनाही तुम्ही ही इडली अगदी पोटभर देऊ शकता. पचायला सोपी असल्याने अगदी वृद्ध व्यक्तींना सुद्धा ही चालते. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही इडली पौष्टिकच आहे त्यामुळे तुम्ही तर नक्कीच करा. आणि कदाचित तुमच्या आजूबाजूला ओळखीच्या मध्ये किंवा नातेवाईकात डायबेटिक पेशंट असेल तर त्यांना सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद 😊 🙏 🙏
ज्वारीची इडली रेसिपी मराठीमध्ये , टम्म फुगणारी ज्वारीची इडली,
डायबेटिक फ्रेंडली इडली रेसिपी , पौष्टिक इडली रेसिपी, तांदूळ न वापरता इडली रेसिपी, ज्वारीची इडली, ज्वारीच्या पिठाची इडली रेसिपी, ज्वारीच्या पिठाचे पदार्थ, ज्वारीच्या पिठाची इडली,
Jowar idli, jowar idli recipe, jowar idli recipe in marathi, jowar idli recipe by ujvala cooking and baking, jowar idli without jowar flour, jowar idli batter, jowar idli without rice, jowar idli recipe with jowar flour,no rice idli recipe, diabetic friendly idly recipe , jowar idly recipe, jowar idly recipe in marathi, Jwarichi Idli, Jwarichi Idli Recipe in marathi, Jwarichi Idli Recipe, Jwarichi Idli Recipe by ujvala cooking and baking, diabetic friendly, gluten free recipe, easy breakfast recipe,
#ujvala_cooking_and_baking
#jowaridli
#easybreakfastrecipe
#jwarichiidly
#idlirecipe
#ज्वारीचीइडली
#jowaridli
#noriceidli
#jowarichiidli
#jowarrecipe
#glutenfree
#diabeticfriendlyrecipe
#diabeticfriendly
#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: