Shrirampur Crime | श्रीरामपुरात अल्पवयीन मुलांने गावठी कट्ट्यातून केला गोळीबार, एक जखमी | Crime News
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2025-03-06
Просмотров: 9844
Описание:
Shrirampur Crime | श्रीरामपुरात अल्पवयीन मुलांने गावठी कट्ट्यातून केला गोळीबार, एक जखमी | Crime News
shrirampur child firing vis
Gavthi katta firings
ahilyanagar crime news
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी गोळीबाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आलीये. सुतगिरणी-दिघी रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक भाऊ जखमी झाला आहे, तर दुसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. गुरुवारी भर दिवसा हा गोळीबाराचा थरार घडला आहे. या गोळाबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे यात फिर्यादी आणि आरोपी दोघे ही अल्पवयीन आहे.. जुन्यावादातून हा गोळीबार झाल्याच सांगीतल जातय तर पोलीसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी मुलाच्या आत्याच्या घराच काम सुरु असून बांधकामावर पाणी मारण्यासाठी फिर्यादी, त्याचा भाऊ व अन्य एक असे तिघे जात असताना रस्त्यालगत थांबले होते.
फिर्यादीच्या ओळखीच्याअल्पवयीन मुलगा काळ्या रंगाची एफझेड मोटारसायकलवरुन आला आणि शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने महाविद्यालयात झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत स्वतःच्या कमरेला लपवलेली पिस्तुल बाहेर काढुन फिर्यादीच्या भावाच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली. पिस्तुलातील गोळी जमीनीवर आदळून फिर्यादीच्या भावाच्या पायाला लागल्याने तो जखम झाला. तर दुसरी गोळी हुकवली असून यात फिर्यादी जखमी झालाय त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेय..
तर गोळीबार करणा-या अल्पवयीन मुलाला श्रीरामपुर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलय. या विषयी पोलीस सखोल तपास करत आहेत.
#sp24taas #shrirampur #crimenews #ahilyanagarnews #shrirampurdiaries #shrirampurkar #crimestory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: