Mettupalayam To Ooty Toy Train-भारतातील सर्वात धीमी रेल्वेतला प्रवास/Timing/Ticket Fare
Автор: Pravasi Sahil
Загружено: 2024-11-17
Просмотров: 647
Описание:
#ooty #ootytoytrain #marathivlog
.
.
मुंबईहून जर आपल्याला ऊटी ला जायचे असेल तर आपल्याला रेल्वेचाच पर्याय उत्तम आहे.
मुंबईहून रेल्वे ने आपण मेट्टूपालयम तर नाही पण कोईम्बटूर पर्यंत थेट जाऊ शकतात.
11013 LTT Coimbatore Express आहे जी दरोरोज मुंबई च्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10 वाजून 35 मिनिटाला सुटते जिचं तिकीट भाडे हे स्लीपर चे 625₹ आहे.
ही ट्रेन आपल्याला तिसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 50 मिनिटाला पोहचते.
कोईम्बटूर ला सकाळी पोहचल्यानंतर तुम्ही हॉटेल बुक करून त्याच दिवशी आदीयोगी हे प्रसिद्ध ठिकाण फिरून येऊ शकतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता कोईम्बटूर स्टेशन कडे यावे कारण येथून सकाळची 5 वाजून 10 मिनिटांची निलगिरी एक्सप्रेस पकडायची आहे आणि ही ट्रेन आपल्याला 6 वाजेपर्यंत मेट्टूपालयमला पोहचवते.
मेट्टूपालयम ला पोहचल्यानंतर येथूनच सकाळी 7 वाजून 10 मिनिटांची टॉय ट्रेन पकडायची आहे त्यात तुम्ही अप्रतिम असा निसर्ग पाहत पाहत ऊटी पर्यंत पोहचू शकतात.
.
.
*टॉय ट्रेन मध्ये 1 जनरल, 2 द्वितीय श्रेणी आणि एक फर्स्ट क्लास असे एकूण 4 डबे आहेत.
*जनरल डब्याचे तिकीट 175 असून त्यासाठी आपल्याला सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून रांग लावावी लागते
*द्वितीय श्रेणी चे तिकीट 295 व फर्स्ट क्लास चे तिकीट 600 असून हे तिकीट आपण ऑनलाइन बुक करू शकता.
*ऑनलाइन तिकीट बुक करायचे असेल तर 2 महिने अगोदरच बुक करा कारण तिकिटे लवकर फुल्ल होतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: