Amit V. Deshmukh Speech/ Aarti of Lord Shri at Kaka Ganesh Utsav Mandal and Distributes 101 Bicycles
Автор: Amit V. Deshmukh
Загружено: 2025-09-08
Просмотров: 817
Описание:
Amit V. Deshmukh Speech / Aarti of Lord Shri at Kaka Ganesh Utsav Mandal and Distributes 101 Bicycles
काका गणेश उत्सव मंडळाच्या श्री ची आरती, १०१ सायकलीचे वाटप
शुक्रवार दि. ५ सप्टेंबर २०२५
शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रकाश नगर येथील काका गणेश उत्सव मंडळाच्या श्री ची आरती करण्यात आली. तसेच काका गणेश उत्सव मंडळाच्या वतीने लकी ड्रॉ मधील भाग्यवान व्यक्तींना १०१ सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी काका गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कातळे, काका गणेश उत्सव मंडळ २०२५ अध्यक्ष सतीश (पिंटू)साळुंके,लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके,लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव-ऍड.समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हा.चेअरमन विजय देशमुख,सचिन पाटील,अजित माने,रमेश सूर्यवंशी,माजी नगरसेवक पप्पू देशमुख,प्रभाग १३ चे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऍड. विजय गायकवाड, .फारूक शेख, नागसेन कामेगावकर,प्रा.प्रवीण कांबळे,दत्ता सोमवंशी, गोटू यादव, मुन्ना शिंदे, धनंजय आवसकर, पदमाकर वाघमारे, विष्णुदास धायगुडे, रोहित दयाळ,पियुष शास्त्री,दिगंबर माळी आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते,प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणालो की, श्री गणेश उत्सवानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आपणास श्री गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. प्रकाश नगर येथील काका गणेश मंडळाने एक आगळावेगळा उपक्रम साकारला आहे. या मंडळाकडे मी अनेक वर्षापासून येतो. काका गणेश उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी स्तुत्य उपक्रमाने गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा पाळली जाते. आपल्या मंडळाकडून मागील वर्षी चक्रीभजन सोहळाही येथे संपन्न झाला. या मंडळाची प्रेरणा घेऊन इतर मंडळांनीही लकी ड्रॉ मार्फत सायकलीचे वाटप करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काका गणेश उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कातळे, यांनी करून मंडळाच्या कार्याची माहिती दिली तर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महादेव बन यांनी केले तर शेवटी उपस्थित सर्वांचे आभार धारूरकर महाराज यांनी मानले.
Subscribe For More Updates:
----------------------------------------------
YouTube: / amitdeshmukhofficial
Facebook: / amitdeshmukhofficial
Twitter: / amitv_deshmukh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: