महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली, गो अर्ली’ सवलत | प्रसूती रजेत वाढ | विधानपरिषदेत सुनेत्रा पवार
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-10
Просмотров: 241
Описание:
विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली, गो अर्ली’ ही सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि सक्षमीकरण देणारा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात चौथं महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधन व पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली असून, त्यानंतर गरज असल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धपगारी रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
#SunetraPawar #Maharashtra #WomenEmployees #WomenEmpowerment #ComeEarlyGoEarly #MaternityLeave #InternationalWomensDay #VidhanParishad #WomenPolicy #MaharashtraGovernment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: