विधानपरिषदेत महत्त्वाची माहिती: ५५०० सहायक प्राध्यापक पदे भरणार | कांदा खरेदी
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-10
Просмотров: 971
Описание:
महाराष्ट्र विधानपरिषदेत आज विविध महत्त्वाच्या विषयांवर मंत्र्यांनी माहिती दिली.
राज्यातल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गात एकंदर ११ हजार ९१८ जागा रिक्त असून त्यापैकी सुमारे ५ हजार ५०० पदं भरायची मान्यता मिळालेली आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाफेडने १ लाख ३७ हजार मेट्रिक टन आणि एनसीसीएफने १ लाख ४० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला असून दिल्ली, आसाम तसंच इतर राज्यांमध्ये त्यांची विक्री झाली आहे.
मंत्री संजय सावकारे यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. कांद्याला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळावी, यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील शिक्षकांना पोलीस विभागाप्रमाणे कॅशलेस आरोग्य सेवा देण्याच्या मागणीचा विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
प्रशासकीय कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन राज्य सरकारने ११ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रत्येक कार्यालयासाठी १३ पदे याप्रमाणे एकूण १४३ नवीन पदांच्या निर्मितीलाही सरकारने मान्यता दिली आहे.
मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.
#Maharashtra #VidhanParishad #ChandrakantPatil #OnionFarmers #NAFED #NCCF #Teachers #ChandrashekharBawankule #GaneshNaik #SanjayGandhiNationalPark #MaharashtraNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: