Epstein Files जगासमोर आणणारी पत्रकार Julie Brown कोण ? | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-02-25
Просмотров: 1773
Описание:
#vishaychbhari #juliebrown #epsteinfiles #marathinews
Epstein Files जगासमोर आणणारी पत्रकार Julie Brown कोण ? | Vishaych Bhari
"तुम्ही लाख श्रीमंत असाल, पण आम्ही विकले जाणार नाही", असं म्हणत शक्तिशाली ज्यानं सत्ताधाऱ्यांशी दोन हात करत, सर्वस्व गमावण्याची तयारी ठेवत, एप्स्टिन फाइल्स खुल्या करण्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्या मियामी हेराल्ड वृत्तपत्राची बातमीदार म्हणजे जुली ब्राऊन. बातम्यांच जग वेगान बदलत होतं. वृत्तपत्रांना वृत्तवाहिन्याशी स्पर्धा करावी लागत होती. त्यातच डिजिटल माध्यमांची देखील भर पडली होती. सगळं काही अगदी वेगवान...मिनिटा मिनिटाला अपडेट होणार..... जुली मात्र जुन्या पठडीतल्या रिपोर्टर..अनुभवी, अभ्यासू, पण त्यामुळच कालबाह्य होण्याची टांगती तलवार डोक्यावर... त्यातच सिंगल पेरेंट असल्यामुळ त्यांच्या खांद्यावर दोन मुलांचीही जबाबदारी होती. अशा अवस्थेत नोकरी गमावण परवडणार नव्हतं. त्यांच्यावर जबाबदारी होती, फ्लोरिडातल्या जाचक कारागृहांविषयी, लांबलचक शिक्षेविषयी विषयी बातमीदारी करण्याची. तेवढच तग लावून धरू शकत होत्या. पण त्यांच्यातला पत्रकार त्यांना शांत बसू देत नव्हता. त्या वेश्या व्यवसायात बळजबरीन आणल्या जाणाऱ्या मुलींवर बातमी करत होत्या. इंटरनेटवर माहिती शोधताना दरवेळी एप्स्टिनचा सतत उल्लेख येत होता. तो नेमका कोण होता? त्याच पुढे काय झालं? याचा त्यांनी खोलवर अभ्यास केला. एवढे कांड करून पण सही सलामत कसा सुटला? त्याच्या वकिलांची फौज अत्याचार ग्रस्त मुलींना व्यावसायिक वेश्या ठरवण्यासाठी वाटेल ते प्रश्न विचारत असताना सरकारी वकील शांत का बसले? शोषित मुलींच्या चारित्र्याची चिरफाड आणि आरोपी एप्स्टिनची मात्र नावापूर्ती उलट तपासणी. असं का बरं असेल? हे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरू लागले. याची उत्तरं त्यांना हवी होती. पण ती एवढी सहज मिळण अशक्य होतं. त्यासाठी लागणार होता वेळ. ताज्या गरमागरम बातम्यांसाठी भुकेलेल्या आजच्या जमान्यात ही शिळी बातमी कुणालाच महत्वाची वाटत नव्हती. अगदी त्यांच्या संपादकांनाही. एप्स्टिनच अटक होऊन सुटला होता. त्याची फाईल बंद झाली होती. पण मग नंतर मी टू मोहिमेचा वनवा जगभर पसरला आणि या बातमीसाठी निमित्त निर्माण झालं. संपादकांनी थोडा आणखी संयम दाखवत या बातमीवर काम सुरू ठेवण्याची मुभा दिली. परवानगी मिळाली असली तरी हे प्रकरण उघडकीला आणणं सोप्प नव्हतं. पण तरी देखील जुली ब्राऊन यांनी एप्स्टिनसारख्या खतरनाक केसचा अभ्यास करून त्याच साम्राज्य उध्वस्त केलं. मग या जुली ब्राऊन नेमकी कोण आहेत? त्यांनी हे सगळं कसं केलं? यामध्ये त्यांना काय अडचणी आल्या? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
vishaych bhari, journalist julie brown, julie brown impression, julie brown interview, julie k. brown, julie brown epstein, downtown julie brown, julie k. brown epstein, what happened to downtown julie brown, how julie k. brown caught epstein, epsteinn files, the epstein files, doj epstein files, estein files, epstein files 2026, epstein files update, epstein files public, epstein case files, jeffrey epstein files, epstein files summary, marathi news, trending topic
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: