Indira Gandhi आणि Atal Bihari Vajpayee यांनी US, CIA ला नडत भारतात Nuclear Test कशी घडवून आणली?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-03-03
Просмотров: 77513
Описание:
#BolBhidu #IndiaFooledCIA #PokhranNuclearTest
अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती एवढा मोठा हल्ला का केला? अमेरिकेचा दावा आहे की, खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराण न्युक्लिअर वेपन्स बनवत होता. इराण जर यात यशस्वी झाला असता, तर तो संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरला असता. हे कारण सांगून अमेरिकेनं खामेनेई यांची हत्या केली. त्याआधी अमेरिकेनं इराणला अनेक वेळा वॉर्निंग दिली होती. इराणने अणुबॉम्ब बनवू नये, यासाठी त्या देशावरती अनेक आर्थिक निर्बंधही लावले होते. तरी सुद्धा इराण अमेरिकेला जुमानत नव्हता. आता खामेनेई यांच्या मृत्यूनंतर या संघर्षात अमेरिकाचा विजय झाल्याचं दिसतंय. पण आता ज्या कारणावरून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष झाला, त्याच कारणावरून एकेकाळी भारत आणि अमेरिका सुद्धा आमनेसामने आले होते. त्यावेळी इराणप्रमाणे भारतही अमेरिकेला जुमानत नव्हता. पण शेवटी या संघर्षात भारताचा विजय झाला. १९७४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून अणुचाचण्या केल्या होत्या. ह्या दोन्ही अणुचाचण्या काही सहसाहजी झाल्या नाहीत. त्यावेळी अमेरिकेनं भारतावरती कडक आर्थिक निर्बंध लादले होते, जागतिक बँकेकडून मिळणारं कर्ज रोखलं होतं, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता, एवढंच नाही तर भारताला टेक्नॉलॉजी आणि फ्युअल देण्यासही नकार दिला होता. पण या सगळ्यातून मार्ग काढत इंदिरा गांधी आणि वाजपेयी यांनी अणुचाचणी घेतली. पण हे सगळं घडलं कसं? अमेरिकेनं भारताला विरोध करण्यासाठी काय-काय केलं होतं? भारतानं याला कसं उत्तर दिलं? अमेरिकेचा विरोध झुगारून भारतानं दोन अणुचाचण्या कशा घेतल्या? सविस्तर जाणून घेवूया या व्हिडिओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: