Alka's Recipes

नमस्कार, मित्रांनो......
मी तुम्हा सर्वांचे अलकाज् रेसिपीज् मध्ये मनापासुन स्वागत करते.
मी अलका ह्या चॅनलची होस्ट.मी मूळची जळगावची असून सध्या पुण्यात राहते. मी व्यवसायाने 'मराठी' या विषयाची शिक्षिका (Teacher) असून मला लहानपणापासूनच स्वयंपाकाची, वेगवेगळे पदार्थ बनविण्याची खूप आवड आहे. तर मी माझी ही आवड अलकाज् रेसिपीज् मधून तुम्हा सगळ्यांनसमोर आणणार आहे.
माझ्या चॅनल मध्ये सर्व पारंपारिक, आधुनिक, काळानुसार बदलत जाणाऱ्या...... शिवाय साउथ इंडियन रेसिपीज, मराठी रेसिपीज, गुजराती रेसिपीज, पंजाबी रेसिपीज, राजस्थानी रेसिपीज, इंडो चायनीज रेसिपीज, अशा भारतातल्या विविध राज्यांमधल्या व्हेज आणि नॉनव्हेज दोघेही प्रकारच्या रेसिपीजचा आस्वाद तुम्हाला घेता घेता येणार आहे.
माझ्या या चॅनल मध्ये अगदी पुरणपोळी पासून ते चहापर्यंतच्या छोट्या-मोठ्या रेसिपी असणार आहेत. माझ्या चॅनेल चे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे यात रेसिपीज सोबत सणासुदींचे व्हिडिओज् व किचन टिप्स् पण असणार आहेत.
तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास खूप मदत करणार आहे. तर मित्रांनो माझ्या या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद !!🙏