Kalyan-Dombivli Operation Lotus नंतर बिनविरोध पॅटर्न,BJP Shinde यांच्या बालेकिल्ल्यात आघाडीवर कशी ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-02
Просмотров: 206563
Описание:
#BolBhidu #KDMCElection #BJPvsShinde
१८ नोव्हेंबर २०२५ मंगळवार होता, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीचा दिवस. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेकडून एकच मंत्री उपस्थित होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बाकीचे मंत्री गेले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात. का ? तर भाजपने केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे. एकनाथ शिंदेंचं त्यातही त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचं होमग्राऊंड असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक गळाला लावले. श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले कार्यकर्ते आपल्याकडे घेतले. संतापलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे याबद्दल तक्रार केली, शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या आल्या, शिंदेंनी दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली, चव्हाणांची तक्रार केली. सगळा राडा कल्याण डोंबिवलीसाठी झाला. मग कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे-भाजपमध्ये युती झाली, शिंदेंची शिवसेना इथं मोठा भाऊ ठरली.
पण ज्या कल्याण डोंबिवलीसाठी शिंदेंनी अमित शहांना गाठलं, तुटेल याची शक्यता निर्माण होईपर्यंत ताणलं, त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, मतदान होण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचे इथून ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, तर बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा आकडा आहे १५. शिंदेंच्या गोटात आनंद आहेच, पण त्यापेक्षा जास्त तो भाजपच्या गोटात आहे. कारण १५ जागा भाजपने आधीच जिंकल्या आहेत, त्यांची भले एकहाती सत्ता येणार नाही. पण भाजपने जास्त जागा जिंकल्या तर शिंदेंची कोंडी नक्की आहे. पण शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हे भाजपला जमलं कसं ? मदतीसाठी दोस्ती धावून आली का ? कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: