लाडकी बहीण योजना: e-KYC, चौकशी आणि सरकारची ग्वाही | Scheme Update
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-12-10
Просмотров: 3129
Описание:
राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा आज विधानसभेत झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, तसेच बोगस लाभार्थ्यांकडून रकमेची वसुली सुरू असून योजना कधीही बंद होणार नाही. त्यांनी विरोधकांवर या योजनेत खोडा घालण्याचा आरोप केला.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील २ कोटी ४३ लाख अर्जांपैकी २६ लाखांची तपासणी झाली असून ४ लाख लाभार्थ्यांची सखोल चौकशी सुरू आहे. आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतला असून त्यांच्याकडून वसुली दोन महिन्यांत पूर्ण होईल. e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, किरकोळ विदेशी व देशी मद्य दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची NOC आता बंधनकारक राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
#ddsahyadri #LadkiBahinYojana #eKYC #MaharashtraAssembly
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: