अजिंक्यतारा किल्ला (हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी) | Ajinkyatara Fort | Satara_Fort | वृक्षारोपण
Автор: Psycho Prashil
Загружено: 2025-09-27
Просмотров: 171048
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला ...
----------------------------------------------------------
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.
सातारा शहरापासून किल्यावर जाण्यासाठी 25 ते 30 मिनिटांचा अवधी लागतो.
----------------------------------------------------------
अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.
प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.
इतिहास
सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते.या किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अजिंक्यतारा किल्ल्याचे किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील होते. बादशाहा औरंगजेब यांचा थोरला मुलगा शाहजादा आजम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील यांनी ताकदीने मुकाबला करून किल्ला वाचविण्यासाठी शर्तीचा लढा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसऱ्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
#Ajinkyatara Fort #Satara_Fort #forts #psychoprashil #travel #mountains #nature #chatrapatishivajimaharaj #channel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: