गिरनार - संपूर्ण शंका निरसन
Автор: Omkara Vlogs
Загружено: 2024-11-13
Просмотров: 154994
Описание:
#marathivlogs #omkara #incredibleindia #travel #travelvlog #god #temple #devotional #hindutemple #dattaguru #dattatreyatemple #10000steps
संपूर्ण गिरनार दर्शन - • संपूर्ण गिरनार दर्शन मराठी मध्ये #ropeway ...
संपूर्ण गिरनार परिक्रमा - • संपूर्ण गिरनार परिक्रमा मराठीमध्ये #girnar...
गिरनार - संपूर्ण शंका निरसन - • गिरनार - संपूर्ण शंका निरसन #ropeway #datt...
श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ - • श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ - Narsinh...
0:00 गिरनारला नक्की काय आहे ?
2:20 गिरनार ला जाण्यासाठी उत्तम असा काळ कोणता ?
2:57 गिरनारला जावे कसे ?
3:25 महाराष्ट्रातून जाणाऱ्या ट्रेन.
5:10 विमानाने कसे जावे ?
6:18 गिरनारला राहण्याची, खाण्याची सोय
8:03 गुरुशिखरच्या दर्शनासाठी Ropeway की पायऱ्या ?
11:22 डोली ची सोय
12:37 Ropeway चा फायदा
13:13 पायऱ्या चढताना घ्यायची काळजी आणि उपलब्ध सोयी
14:44 Washroom ची सोय
16:03 पायऱ्या चढताना वापरायचे चप्पल
18:18 पहिल्या पायरीचे महत्व
19:08 गिरनार परिक्रमा म्हणजे काय ?
20:51 गिरनार परिक्रमा आणि गुरु शिखर दर्शन
Girnar Ropeway Booking:-
https://udankhatola.com/destination/g...
Girnar itinerary from Maharashtra:-
• Train Option 1
SAURASHTRA JANTA 19217 Runs on: All Days
BANDRA TERMINUS BDTS to JUNAGADH JN JND to VERAVAL VRL
VERAVAL EXPRESS 16334 Runs on: Tue
RATNAGIRI RN to JUNAGADH JN (JND) to VERAVAL VRL
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे.
स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.
ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!
१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.
श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
स्थान
कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.
ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.
#DailyVlogs
#trekking #GirnarTrek #10000Steps #TrekkingIndia #MountainClimb #AdventureVlog #ClimbingGirnar #IndianTrekker #FitnessTrek #DattatreyaTemple #SpiritualJourney #GirnarDarshan #FaithAndDetermination #MindBodySoul #DarshanVlog #SacredMountains #IndianVlogger #TravelWithMe #RealJourney #VlogLife #EmotionalVlog #YouTubeIndia #ViralTrek
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: