मुहूर्त | जात्याचा मुहूर्त | खिसका मुहूर्त करणे | लग्नाआगोदरचे विधी परंपरा | wedding preparation
Автор: San Sanskruti By Megha
Загружено: 2024-07-31
Просмотров: 470
Описание:
पूर्व तयारी - घरातील जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन कुटुंबातील कुलाचार याप्रमाणे जात्याचा मुहूर्ताचा दिवस नक्की करावा.
घरातील सुशोभन, बैठक व्यवस्था आणि पाहुणचाराची तयारी करावी.
सुवासिनींना ओटी आणि भेटवस्तूची तयारी करावी.
साहित्य-जाते,खलबत्ता, उखळ,मुसळ ,चार/पाच लेकुरवाळे हळकुंड,पांढऱ्या कापडाची पट्टी/फॉल ,सुट्टी नाणी , फॉल ,सुपारी, अक्षता, गूळ ,गहू,पाणी आणि पाच सुवासिनी
जाते पूजन कशासाठी /का केले जाते ?
जाते पूजनाचा आणि उखळ, मुसळ, खलबत्ता या साधनाचे पूजन करण्याचा हेतू काय आहे?
पूर्वीच्या काळी धान्य घरी दळले जात असे.
आपल्या घरी कार्य असायचे त्यावेळी आपल्या कडे भरपूर पाहुणे येत असत .
त्यावेळी या साधनांचा स्वयंपाक करण्यासाठी वापर भरपूर प्रमाणात केला जात असे .
त्यामुळे या साधनांची विधिपूर्वक पूजा करून शुभकार्याच्या प्रारंभ केला जात असे.
गृहलक्ष्मी जात्याला मानतात. माजघरात जाते असल्यास घरात कायम लक्ष्मी वास करते,
घरात अन्न कमी पडत नाही असे म्हणतात.
जात्याचे सुशोभन
हळद आणि कुंकू ओले करून जात्याचे सुशोभन करा.
जात्याच्या सभोवती पाना फुलांचे सुशोभन करा
जात्याच्या खाली रंगीत कापड किंवा ब्लाऊज पीस अंथरावा.
जात्याच सभोवती गोलाकार असे महिलांना बसता येईल अशी जाते पूजनाची जागा ठरवा आणि पूजेची मांडणी करा . जाते पूजन करून जात्यात हळद दळणार आहोत.
जात्यावर प्रथम हळद का दळली जाते ?
जात्यावर प्रथम हळद दळण्याचे कारण असे कि हळदीमध्ये जंतुनाशक तत्व आहेत.
जाते पूजनविधी /गणपती पूजा विधी
सुपारीस गणेश मानून पुजतो म्हणून जात्यापुढे अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी .
सुपारीस हळद, कुंकू, अक्षता वाहाव्यात आणि फुल अपर्ण करावे.
जात्यापुढे पान सुपारीचा विडा आणि नाणे ठेवावे. त्यास हळद कुंकू वाहावे.
मुहूर्त कार्यामध्ये गणपतीचा नैवद्य गूळ खोबऱ्याचा असतो.
गणपतीपुढे पाण्याचे मंडल काढून त्यावर नैवेद्याचे गूळ खोबरे ठेवावे.
गणपतीला प्रार्थना करावी " हे गणपती बाप्पा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत.
तुझे आशीर्वाद आणि कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू देत"
जात्यास हळदीने पिवळे केले कापड बांधावे
जात्याच्या पूजनासाठी फॉल किंवा पांढऱ्या कापडाची पट्टी हळदीच्या पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्यावी.
त्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, खोबरे घालून गाठ मारून घ्यावी.
कापड जात्याभोवती, किंवा खुंटाला बांधावे.
सर्व सवाष्णींनी मिळून प्रसन्न, उत्साही वातावरणामध्ये लग्नाची हळद दळण्याचा कार्यक्रम करावा.
सनईच्या सुरावटी मध्ये पारंपरिक लग्न गीतांचा तालावर, उखाणे घेत हळद दळावी .
खिसका म्हणजे काय ?
लग्नाअगोदरचा खिसका करणे हा विधी खूप महत्वाचा असतो.
खिसका म्हणजे विधिपूर्वक लेकुरवाळी हळद दळून, गहू ,ज्वारी कांडून दळून एकत्र केलेले मिश्रण.
खिसका करणे विधी
सर्व महिलांनी मिळून लग्न गीते गात उखळाचे पूजन करून घ्यावे. त्यामध्ये गहू ज्वारी कांडून घ्यावी.
लेकुरवाळी हळकुंड बत्त्यात कांडून घ्यावीत.
दळलेले हळद, गहू आणि ज्वारी हे सर्व जिन्नस एकत्र केले म्हणजे खिसेका तयार झाला.
हा खिसका बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.
मराठवाड्यामध्ये येसर केले जाते. त्यामध्ये या मिश्रणात वेगवेगळे धान्य आणि मसाले टाकले जातात.
खिसका लग्न कार्यामध्ये कधी वापरतात ?
लग्नपूर्व विधीमध्ये देवकार्यायच्या दिवशी सवाष्णीचा मान करताना आपण तिला पान सुपारीचा विडा देतो त्यावेळी त्या विड्यासोबत सुपारी, हरभरे आणि हा खिसका देतो.
खिसका / येसर हे सवाष्ण भोजन/देवकार्य दिवशी मानाचे असते.
देवकार्याच्या दिवशी नवरदेव सर्व करवल्यानं सोबत देवदर्शनाला जातो तेव्हा देवा पुढे पानसुपारी विडा आणि खिसका ठेवतात.
शकुन दीप दिवा कणकेचा करतात त्यामध्ये पीठ मळताना पिठात हा खिसका घालतात.
लग्नविधी पूर्वी (वरात) नवरदेव जेव्हा देवदर्शनाला जातो त्यावेळी देवासमोर पानसुपारी विडा आणि खिसका ठेवला जातो.
मुहूर्त विधीमध्ये आपण हळद कुटली ,हळद दळली , धान्य कांडले ,
मुहूर्त करण्यासाठी सवाष्ण जमलेल्या असतात त्यामुळे एकाच वेळी हा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी केला जातो. वेगवेगळ्या दिवशीही हा करता येतो आपल्या सोईप्रमाणे त्याचे नियोजन करावे.
कुटुंबाचा सहभाग आणि कुळाचार
हे सर्व करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट करावी. घरातील जेष्ठाना कुटुंबातील कुलाचार, चाली, रीती, परंपरा विचारावेत. त्या समजून घ्याव्यात.
त्याप्रमाणे तयारी करून हा कार्यक्रम करावा.
या विधीच्या वेळी जर वधू /वर उपस्थित असतील तर वधू वरास उभा पूजेमध्ये सहभागी करून घ्यावे.
गणपतीला हळद कुंकू वाहून बाप्पाचे आणि जेष्ठांचे पाया पडून आशीर्वाद घेण्यास सांगावे.
त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा आपली परंपरा सांभाळताना ती समजून घेऊ त्या मागचे हेतू जाणून घेऊन आजच्या दिवसांमध्ये तो सोयीच्या दृष्टीने कसा करता येईल याचा विचार करावा. त्यामागील शास्त्र समजून तो केल्याने त्या कार्याचा आनंद द्विगुणित होतो.
अशा रीतीने हा कार्यक्रम करून आपण आपल्या शुभकार्याच्या खरेदीला सुरवात करावी.
हा मुहूर्ताचा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटलं याचा अभिप्राय तुम्ही मला माझ्या youtube चॅनलवर नक्की द्या.
तुमच्या घरातील काही वेगवेगळ्या परंपरा चालीरीती आणि विधी असतील तर त्या मला जरूर शेअर करा. त्यातील विविधता मला जाणून घेणे नक्की आवडेल.
हा व्हिडीओ संपुन पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: