BMC Election News LIVE | पालिका निवडणुका जाहीर मुंबईत मतदान कधी? | Mumbai Election | Mumbai Polls
Автор: CNBC-TV18
Загружено: 2025-12-15
Просмотров: 378
Описание:
Election Commission PC | LIVE | BMC Election 2026 Update | Municipal Polls | Local Body Polls
राज्य निवडणूक आयोगाची आज (15 डिसेंबर) पत्रकार परिषद (State Election Commission Maharashtra) होणार आहे. सायंकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद होईल. महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून (Municipal Corporation Election 2025) आज घोषणा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. काल राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे महानगपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागणार की काय?, हे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच समोर येईल.
राज्यातील एकूण 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रलंबित आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आता राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली होती. (Local Bodies Election)
कोणत्या 29 महापालिकेची निवडणूक होणार? (Municipal Corporation Election 2025)
1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई विरार महानगरपालिका
महानगरपालिका आणि एकूण जागा- (Municipal Corporation Election 2025)
1. बृहन्मुंबई - 227
2. भिवंडी-निजामपूर - 90
3. नागपूर – 151
4. पुणे – 162
5. ठाणे - 131
6. अहमदनगर - 68
7. नाशिक – 122
8. पिंपरी-चिंचवड - 128
9. औरंगाबाद - 113
10. वसई-विरार - 115
11. कल्याण-डोंबिवली - 122
12. नवी मुंबई - 111
13. अकोला - 80
14. अमरावती - 87
15. लातूर - 70
16. नांदेड-वाघाळा - 81
17. मीरा-भाईंदर - 96
18. उल्हासनगर - 78
19. चंद्रपूर - 66
20. धुळे - 74
21. जळगाव - 75
22. मालेगाव - 84
23. कोल्हापूर - 92
24. सांगली-मिरज-कुपवाड - 78
25. सोलापूर - 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना-
28. पनवेल - 78
29. परभणी – 65
#bmc #bmcelections #mumbaielections #electioncommission #cnbctv18
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: