l श्री गुरुचरित्र अध्याय पहिला । shree Gurucharitra chapter 1 l
Автор: SPIRITUAL ENERGY अध्यात्मिक शक्ति
Загружено: 2026-03-03
Просмотров: 494
Описание:
श्री गुरुचरित्र
अध्याय १ (मराठी भावार्थ)
सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती-गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात, ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधुसंत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्रीगणेश, श्रीसरस्वती, तसेच ब्रह्मा विष्णू महेश-त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्रीनृसिंहसरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे.
गाणगापूरनिवासी श्रीनृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी, म्हणून
त्यांचा नामधारक असा एक साधक, अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकूळ अंतःकरणाने गुरूची करुणा भाकली. परमेश्वर व गुरू एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली.
नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्रीगुरू आपण होऊन त्याच्याजवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलांबर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदयमंदिरात स्थान दिले, त्याचप्रमाणे, त्यांची षोड्शोपचारे पूजाही केली.
.
.
.
.
.
#shreegurucharitra #shreegurudevdatta #shreeswamisamarth #श्रीगुरुचरित्र #श्रीस्वामीसमर्थ
#श्रीगुरुदेवदत्त
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: