१ किलो गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया सोप्पी पद्धत आणि भरपूर टिप्स | gavhachi kurdai उन्हाळी वाळवण
Автор: Jalgaon Tadka Recipe
Загружено: 2024-04-24
Просмотров: 1803
Описание:
१ किलो गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया सोप्पी पद्धत आणि भरपूर टिप्स | gavhachi kurdai उन्हाळी वाळवण | लोकवन गव्हाची कुरडई| Jalgoan Tadka Recipe
साहित्य -
१ किलो गहू ( लोकवन गहू )
गव्हाचा तयार चिक - १ भांडे
पाणी - १ भांडे
(व्हिडीओमध्ये जास्तीचे १ कप पाणी गरजेनुसार वापरले आहे .)
मीठ चवीनुसार
तुरटी ( १ ते २ फेर पाण्यावर फिरवायला )
टिप्स -
👉🏼 गहू तीन दिवस भिजल्यानंतर वाटून घेण्याच्या आधी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे, त्यामुळे चिकाला आणि कुरडईला आंबट वास येत नाही..
👉🏼कुरडई साठी चिकाच्या बरोबरीने पाणी घ्यावे म्हणजे चिक छान घट्ट असा तयार होतो,गव्हाच्या दर्जेप्रमाणे पाणी थोडे एखाद कप कमी अधिक होऊ शकते.
👉🏼कुरडईसाठी तुरटीचा वापर खूप जास्त केल्याने कुरडई तळल्यानंतर लाल होते त्यासाठी तुरटी एक ते दोन फेरच पाण्यावर फिरवून घ्या..
👉🏼 पांढरी शुभ्र कुरडई होण्यासाठी चीक वस्त्रगाळ करून घ्यावा..किंवा पिठाच्या चाळणी मधून दोन वेळा गाळून घ्यावा..
👉🏼कुरडई छान गुबगुबीत होण्यासाठी चीक नेहमी घट्टच बनवावा.. चिकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास कुरडई चपटी होते..
👉🏼चिक शिजवत असताना तो छान काचासारखा पारदर्शक आणि चमकेल तोपर्यंत पूर्ण शिजवावा..
👉🏼कुरडईचा चिक कच्चा शिजवला गेल्यास कुरडईचे तार तुटतात आणि कुरडई ठिसूळ होते..
👉🏼 तयार झालेल्या कुरडया कडकडीत उन्हामध्ये कडक होईपर्यंत वाळवून त्या हवाबंद डब्यामध्ये भराव्यात म्हणजे वर्षाभरापेक्षा जास्त टिकतात..
marathikurdai, how to make kurdai, kurdai recipe in Marathi, ravyachi kurdai, nachanichi kurdai, chikachi kurdai, wheat kurdai, 1 Kilo gavhachi kurdai, दुप्पट फुलणारी कुरडई, चिकाच्या कुरडई, उन्हाळी वाळवण रेसिपीज, कुरवड्या, गव्हाची कुरडई पारंपरिक रेसिपी, पारंपरिक चौपट फुलणारी कुरडई, २ किलो गव्हाची चिकाची कुरडई, वाळवण रेसिपीज, १ किलो प्रमाणात गव्हाची कुरडई, २ किलो गव्हाची कुरडई, कुरडई रेसिपी मराठी, पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन कुरडई
#Gavhachikurdai
#1kilogavhachikurdai
#kurdairecipe
#Unhalivalvan
#Kurvadirecipe
#Jalgoantadkarecipe
#कुरडईरेसिपी
#गव्हाचीपांढरीशुभ्रकुरडई
please like share comment and subscribe with 🔔 bell icon
Thanks for watching 🙏🏼
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: