हुशार नावाडी | मराठी गोष्टी | लहान मुलांच्या कथा | Marathi kids Children's stories |
Автор: लहान मुलांच्या गोष्टी
Загружено: 2023-10-06
Просмотров: 1887
Описание:
एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला प्राणी पाळण्याचे खूप आवड होती. त्याच्याकडे शेळी, सिंह, मेंढ्या गाय अशाप्रकरे अनेक प्राणी होते. त्या शेतकऱ्याच्या घराजवळ एक नदी होती.एके दिवशी शेतकरी शेतातून येत असताना त्याच्याकडे शेळी, सिंह आणि गवताची पेंढी असते परंतु त्या दिवशी त्या नदीला पूर आलेले असतो. त्या शेतकऱ्याला काही सुचत नाही कस जावे नदी पार करून हा प्रश्न त्याच्यासमोर पडतो. तेव्हा त्या शेतकऱ्याला एक नावाडी नाव घेऊन येताना दिसतो.
तो त्या नावाड्याला बोलवून घेतो व सांगतो ह्या तीन गोष्टी आहेत. त्या तीन गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या तर मी तुला बक्षीस देईल. तो नावाडी विचार करू लागतो मग घेऊन जाण्यासाठी तयार होतो.जर नावाड्याने गवत पहिल्यांदा घेतलं तर सिंह शेळीला खाऊन टाकेल. जर सिंहाला घेतलं तर शेळी गवत खाऊन टाकेल प्रश्न पडतो. नावाडी हुशार असल्यामुळे तो विचार करतो आणि कामाला सुरुवात करतो. नावाडी नावेत पहिल्यांदा शेळीला घेतो. तिला दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर तो सिंहाला घेतो. सिंहाला दुसऱ्या टोकाला सोडतो आणि शेळीला स्वतःबरोबर घेऊन परत या तीराला येतो.त्यानंतर तो शेळीला तिथेच ठेवतो आणि गवताची पेंढी दुसऱ्या टोकाला घेऊन जातो. सिंह आणि गवताची पेंढी एकत्रित ठेवतो. पुन्हा शेळीला आणण्यासाठी निघतो. शेतकरी खुश होतो. तो नावाड्याला बक्षीस देतो.
तात्पर्य- विचार करून काम केले तर अशक्य गोष्ट पण शक्य होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: