🔴LIVE : बीड येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे यांची सभा लाईव्ह | Beed Pankaja Munde
Автор: VIRAL IN INDIA
Загружено: 2019-08-26
Просмотров: 160275
Описание:
#MarathiNews #BJP #Beed #DevendraFadnavis #Live #PankajaMunde
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. 26) दुपारी जिल्ह्यात दाखल झाली. आज आष्टी व बीड या दोन ठिकाणी सभा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम होणार आहे.
पाथर्डी (जि. नगर) येथील सभा आटोपून महाजनादेश यात्रेचा ताफा धामनगाव (ता. आष्टी) येथे पोचला. या ठिकाणी त्यांची जनादेश यात्रेच्या रथातून मिरवणुक निघाली. त्यांच्या समवेत पालकमंत्री पंकजा मुंडे देखील आहेत. दरम्यान, यानंतर आष्टी येथे आणि रात्री बीडला सभा होणार आहे. वाटेत त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात येणार असून बीडमध्ये दुचाकी फेरी काढून यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर मुख्यमंत्री बीडमध्ये मुक्काम करतील. मंगळवारी (ता. 27) गेवराईत सभा होणार आहे.
#NCP #AjitPawar #PritamMunde #BJP #DhananjayMunde #MahajanadeshYatra #SandeepKshirsagar #ShivSena #RajThackeray #SharadPawar #Beed #VidhanSabhaElection2019
Beed: BJP's Mahajanesh Yatra, headed by Chief Minister Devendra Fadnavis, arrived in the district on Monday (26th). There will be meetings in Ashti and Beed today and after that the Chief Minister will be staying.
Meeting at Pathardi (Dist. Nagar), after reaching Mahajanesh Yatra, reached the Dhamnagaon (Ta Asti). At this point, his mandate departed from the chariot of Yatra. He is accompanied by Guardian Minister Pankaja Munde. In the meantime, there will be meetings at Asti and Beed in the night. They will be welcomed on the way and will be welcomed by taking a two-wheeler ride in Beed. The Chief Minister will then stay in the bid. The meeting will be held at Gevraite on Tuesday (27th).
डमध्ये आयोजित भाजपच्या महाजनादेश यात्रेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे व सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ' ज्यांचा हात धरून मी पुढे आलो, त्या गोपीनाथ मुंडे यांचा हा जिल्हा आहे. त्यांचा वारसा पंकजा आणि प्रीतम या चालवित आहेत. ही महाजनादेश यात्रा ही संवाद साधण्यासाठी आहे. मागील पाच वर्षांत जनतेच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम आम्ही केले. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन यात्रा काढल्या संघर्ष यात्रा काढली ती यशस्वी झाली नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, माझ्यासोबत मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करावी. मात्र, मला पंकजा व प्रीतम यांना त्यांच्यासोबत डिबेट करायची गरज नाही. त्यासाठी आमचे आमदार सुरेश धस पुरेसे आहेत. शरद पवार यांची मुलगी निवडून आली तर इव्हीएम चांगले आणि प्रीतम मुंडे निवडून आल्या तर इव्हीएम खराब असा कांगावा विरोधक करतात. मात्र, यांची दुर्दशा अशी होणार आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेते होऊ शकतील एवढे सदस्य निवडून येणार नाहीत.'
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लोकांचा चेहरा दिसल्याशिवाय मी राजकारण करू शकत नाही. पाच वर्ष यशस्वीपणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केले. माझ्या वडिलानंतर देवेंद्र फडणवीस माझे गुरू आहेत. आम्ही आमचा अंगठा तुमच्यासाठी देऊ मात्र, तो अर्जुनासाठी असावा. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सडक योजना या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झाले. आजपासून आपल्याला जिल्ह्यातून राष्ट्रवादी नेस्तनाबूत करायची आहे. जिल्ह्यातील पाच आमदार निवडून आणण्यासाठी झटणार आहोत.'
खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या 'बीडची आमदार आणि खासदार मीच आहे. लोकसभा आमच्या विरोधात निवडणुकीत खालच्या पातळीवर जावून विरोधकांनी प्रचार केला. मात्र, शिवाजी महाराजांचे नाव घेणारे आता त्यांची शिकवणूक विसरले आहेत. त्यांचे नाव घेण्याचा हक्क या मंडळीना नाही.'
मुंडे-मेटे संघर्ष कायम
लोकसभा निवडणुकीत आमदार विनायक मेटेंनी भाजपच्या उमेदवारा विरोधात प्रचार केला होता. मात्र, बीडमध्ये यात्रेत मेटे यात्रेच्या रथावर चढल्याने पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे या संतपाल्या होत्या. तर भरसभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मेटेंच्या कतीबाबत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत दुर्दशा होणार आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत ही काँग्रेस, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते होऊ शकणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: