संकासुर I गुहागरचं सांस्कृतिक वैभव जगासमोर ठेवणारा माहितीपट I Shankasur
Автор: Dr.Subhash Khot
Загружено: 2024-03-14
Просмотров: 167693
Описание:
जिथे जगभर, लोक स्वतः देवदर्शनाला जातात, तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे. गावोगावच्या सोपस्करात विविधता पाहायला मिळते. शंकासुर, देवखेळे, गोमूचा नाच, पालखी सोहळा, होम या शिमगोत्सवातून मिळणारी ऊर्जा घेऊन प्रत्येक कोकणवासी पुन्हा परततो आपल्या दैनंदिन जीवनात आणि त्याक्षणापासून वाट पाहतो ती पुढच्या वर्षी येणाऱ्या शिमग्याची. आज जिथे आपला मानसिक स्वास्थ्य हरवलेला असताना या आनंदी पर्व सोहळ्यात आपण मग्न होतो भौतिक जगातून अध्यात्मिक वातावरणात प्रवेशतो अध्यात्माची ही ताकदच आजच्या जगण्याची प्रेरणा आहे ही संस्कृती या लोककला हेच आमचं जगणं आहे.
इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडली समुद्राच्या निळाईची, ताज्या माश्याच्या मेजवानीची, नारळीपोफपळी च्या ऐसपैस बागांची, एकांतात वसलेल्या पुरातन देवळांची. इथल्या मातीच्या कणाकणात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा. शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिव्हाळ्याचं प्रतीक आहे.
मग येताय ना शिमग्याला !!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: