कापूस बोंड आळी नियंत्रण | kapus bond ali niyantran | cotton bollworm control
Автор: Krushi Doctor
Загружено: 2023-08-17
Просмотров: 1752
Описание:
✅👨🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील, ते देखील तुमच्या मराठी भाषेत. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
✅विषय - कापूस बोंड आळी नियंत्रण | kapus bond ali niyantran | cotton bollworm control
🔗ग्रुप लिंक - https://chat.whatsapp.com/K470ZIl5JTk...
1️⃣बोंड अळीचा प्रकार | Types of cotton bollworm -
1. ठिपक्याची बोंड अळी - 30 ते 65 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)
2. अमेरिकन बोंड अळी - 45 ते 85 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)
3. रोटरी गुलाबी बोंड अळी - 75 ते 110 दिवस (पिकांवर येण्याचा कालावधी)
2️⃣जीवनक्रम व ओळख | pink bollworm lifecycle -
1. अंडी आकाराने चपटी व 1 मि.मी. लांब असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
2. अंडी अवस्था सुमारे 3 ते 5 दिवस राहते व या पक्व झालेल्या अंड्यातून सफेद रंगाची 1 मिमी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते.
3. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते.
4. अळी अवस्था सुमारे 8 ते 21 दिवसांच्या दरम्यान असते.
5. कोषावस्था मध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे 8 ते 10 मि.मी. लांब असते.
6. तसेच कोषावस्था सुमारे 6 ते 20 दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात.
7. पतंगाची लांबी सुमारे 8 ते 9 मि.मी.असते व ते करड्या रंगाचे दिसतात.
8. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात व पाठीमागील पंख पतंगावस्था सुमारे 5 ते 31 दिवस राहते.
3️⃣नुकसानीचा प्रकार | pink bollworm symptoms -
1. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारीक कणांच्या सहाय्याने छिद्र बंद करते.
2. ज्या मुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
3. या अळीचा प्रादुर्भाव बोंडा मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
4. किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक्व न होता च फुटतात.
5. गुलाबी बोंडअळी सरकीचे नुकसान करते. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होते.
4️⃣आर्थिक नुकसान पातळी | pink bollworm ETL - फेरोमोन सापळ्यामध्ये सरासरी आठ ते दहा नर पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळून येणे अथवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येणे.
5️⃣यजमान पिके | Host plants - कापूस, अंबाडी, भेंडी, जास्वंद, तागा
6️⃣कपाशी गुलाबी बोंड अळी नियंत्रण | pink bollworm control -
1. प्रति एकर 8 ते 10 कामगंध सापळ्यांचा वापर करावा. त्यात सापडणारी नर पतंग गोळा करून नष्ट करावेत.
2. गरजेनुसार वेळोवेळी कामगंध सापळ्यात ल्युअर बदलून घ्यावे.
3. कापूस साठवण केलेल्या जागी आणि जिनिंग-प्रेसिंग मिलच्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावेत.
4. पुढील वर्षी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करावेत.
5. त्यासाठी कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून द्यावीत.
6. उर्वरित शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणास मदत होते.
डिसेंबरनंतर कपाशी पिकाचा खोडवा (फरदड) अनेक शेतकरी ठेवतात.
7. जास्त पाणी दिल्याने कपाशीला पाते, फुले व बोंडे गुलाबी बोंड अळीच्या उपजीविकेसाठी कपाशी बोंडे उपलब्ध होत राहतात.
8. परिणामी किडीची वाढ होत राहते. ही कीड बी. टी.ला प्रतिकारकता निर्माण करते.
9. म्हणून डिसेंबर ते 15 जानेवारीच्या आत पीक काढून टाकावे. किंवा खोडवा घेणे टाळावे.
10. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या शेतात किंवा शेताजवळ त्यांचा ढीग करून ठेऊ नये.
11. अशा पऱ्हाट्यांचा रोटाव्हेटरच्या साह्याने चुरा करून त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल.
12. किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा शेतात गोळा करून जाळून नष्ट करावा.
13. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकाची फेरपालट करावी.
14. पाण्याची उपलब्धता नसल्यास डिसेंबर महिन्यानंतर शेत 5 ते 6 महिने कापूस पीक विरहित ठेवावे.
15. गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
16. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी.
7️⃣रासायनिक पद्धत | pink bollworm chemical control -
1. बोंडअळी (cotton pink bollworm) चा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
2. ज्या शेतकऱ्यांची कपाशीची लागवड उशिरा केली होती, त्यांनी गरज भासल्यास सायपरमेथ्रीन (सुपर किलर, धानुका) (10 टक्के ई.सी.) 1 मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
3. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी (कराटे, सिजेंटा) 8 मिली किंवा टर्मिनेटर 50,अग्रोसिस,क्लोरोपायरीफॉस 50 ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✅संपर्क -
📱What's App:- 9168911489 ☎️
📱Mail id:- st89114.ack@gmail
✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट -
1️⃣Linked In - / krushidoctor
2️⃣Twitter - / krushidoctor
3️⃣Website - https://krushidoctor.com/
4️⃣Youtube Marathi - / krushidoctor
5️⃣Facebook - / krushidoctorofficial
6️⃣Instagram - / krushi_doctor_official
7️⃣Youtube Hindi - / @krushidoctorhindi
#agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #krushidoctorsuryakant
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: