Asian Paradise Flycatcher II स्वर्गीय नर्तक, बाण पाखरू, पतंगा, सुलतान बुलबुल,
Автор: निसर्गानंद / NISARGANAND
Загружено: 2021-04-23
Просмотров: 394
Описание:
नमस्कार मित्रानो,
कसे आहात सगळे? पक्षी मित्रांना पाहताय ना? आज आपण भेटणार आहोत आपल्या ह्या आठवड्याच्या मित्राला. तसेच आताच्या वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वानी मास्क घालून सोशल डिसस्टिंगचे नियम काटेकोर पाळावे हि टीम निसर्गानंद कडून विनंती.
ह्या मित्राला मी जेंव्हा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा डोळ्यासमोरून एखादी वीज चमकून गेली कि काय, किंव्हा एखाद्या बॅले डान्सरने हवेत रिबिनी फिरवून आपली कलाकृती दाखवली कि काय असा भास झाला. ह्या पाखरांच्या हवेतील वावराने एखादा स्वर्गीय अनुभवच आपल्याला रानावनात पाहायला मिळतो. ह्याच्यावर नजर ठरत हि नाही आणि हटत हि नाही. एव्हडा सुंदर हा मित्र आहे. ह्याचे नाव आहे स्वर्गीय नर्तक ( ASIAN PARADISE FLYCATCHER ). मध्यप्रदेश राज्याचा हा 'राज्यपक्षी' आहे, त्याला हिंदीमध्ये 'दूधराज' आणि सुल्तान बुलबुल अशी नावे आहेत. ह्याला बोलीभाषेत पडलेली नावेच त्याचे सौंदर्य वर्णन करतात. शाही बुलबुल, पतंग पक्षी, पतंग, बाण पाखरू...!!! आहेत कि नाहीत साजेशी नावे.
स्वर्गीय नर्तक हा बुलबुलाच्या आकारमानाचा असून प्रौढावस्थेतील नर शुभ्र पांढऱ्या रंगाचा असतो. त्याचे डोके काळ्या रंगाचे असते. युवा नराचा रंग मात्र तांबूस असतो. मादी तांबूस रंगाची असून, तिचे डोके काळ्या रंगाचे असते. दोघांच्या डोक्यावर लहानसा तुरा असतो. विशेष म्हणजे नराला जवळपास फुटभर लांबीची शेपटी असते. एखादी रिबिनच जणू काही
स्वर्गीय नर्तक संपूर्ण भारतात आढळत असून यांच्या दोन उपजाती भारतात तर एक उपजात श्रीलंकेत आढळते. हा पक्षी भारताच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशात स्थानिक असून उर्वरित भागात तो स्थलांतर करतो. दरवर्षी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची असंख्य घरटी सहज दृष्टीस पडतात. ह्याचा अधिवास हा शक्यतो करून गर्द झाडी, रानावनात असतो. विविध प्रकारचे किडे मकोडे हे या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे. रानावनात झाड्यांमधले छोटे छोटे कीटक हा हवेतल्या हवेत सुर मारून खातो.
ह्याचा प्रजनन काळ हा मार्च ते जुलै महिन्याच्या मध्ये असतो. नर आणि मादी दोन्ही मिळून आपले घरटे एखाद्या झाडाच्या फांदीच्या टोकाला बनवतात. मादी एका वेळेस ३ ते ५ अंडी घालते. अंड्यांचा रंग हलका पिवळा, गुलाबी आणि भुरकट लालसर असतो.
एकदा एका तळ्याच्या मध्यावर एका गर्द हिरव्या झाडावर आपला हा मित्र बसलेला मला आढळला. निरीक्षण करताना त्याने सुर्र्कन पाण्यावर झेप घेतली आणि डुबकी मारून दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. हि त्याची क्रीडा मला माझ्या कॅमेऱ्यात कैद करता आली ती आजच्या विडिओ मध्ये आहे.
आजच्या विडिओ मधील दृश्यांचा आनंद घेण्यासाठी विडिओ फुल्ल स्क्रीन मध्ये पाहावा.
त्याच्या हालचाली हावभाव यांचा आनंद घेता यावा हा प्रयत्न आहे म्हणुन एकदा ध्वनीचित्रफितीचा आनंद घ्या नंतर निरिक्षणासाठी उपयोगात आणा हि विनंती
माझा व्हिडीओ पहा, LIKE करा SHARE करा आणि SUBSCRIBE करा.
YouTube Channel :-
निसर्गानंद / Nisarganand
#indianbirds #asianbirds #Flycatcher #paradise #asianparadiseflycatcher #birds #vlog #birding #alandi #pune #dance #balletdancer #ballet
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: