Haravlelya gallerya aani jine (हरवलेल्या गॅलऱ्या आणि जिने)
Автор: Manatun Panavar
Загружено: 2025-12-28
Просмотров: 212
Описание:
Haravlelya gallerya aani jine (हरवलेल्या गॅलऱ्या आणि जिने).
काळच्या ओघात आणि जागेच्या टंचाईत, पुर्वी घराचा अविभाज्य अंग असलेली गॅलरी झपाटय़ाने नामशेष होतेय. जिन्यालाही लिफ्टचा पर्याय आल्यापासून ते आपलं महत्व हरवून बसलेत. हा भाग या दोन जुन्या मित्रांना समर्पित.
जीना....
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे
वसंत बापट.
#marathi #marathikavita #manatunpanavar
#vasantbapat #gallery #jina #vinod
#vinodikavita #humorouswriting
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: