कांदा लसूण विरहित वांग बटाट्याची चमचमीत भाजी नक्की करून बघा | Leena's Sugrankatta
Автор: Leena's Sugrankatta
Загружено: 2024-08-04
Просмотров: 1250
Описание:
#वांगबटाट्याचीभाजी #कांदालसूणविरहितवांगबटाट्याचीरस्साभाजी #कांदालसूणविरहितभाजी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
कांदा लसूण विरहित वांग बटाट्याची भाजी
वांगी २५० ग्रॅम
बटाटे ३
सुक्या खोबऱ्याचा कीस २ टेबलस्पून
नारळाचा चव २ टेबलस्पून
थोडी कोथिंबीर
मिरच्या २
आलं १ इंच
दाण्याचे कूट ३ चमचे
चिंचेचा कोळ १ टेबलस्पून
हळद १ चमचा
तिखट १ चमचा
गोडा मसाला दीड चमचा
धनेपूड १ चमचा
जिरेपूड १ चमचा
गूळ लिंबाएवढा ( चिंचेच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करु शकता.)
मीठ चवीनुसार
वांगी व बटाटे स्वच्छ धुवून, चिरून पाण्यात ठेवावेत.
एका पॅनमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. मग तो बाजूला काढून त्यात नारळाचा चव, मिरच्या आणि आलं भाजून घ्यावे. भाजलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात थोडी कोथिंबीर घालावी. गार झाल्यावर सरभरीत वाटून घ्यावे.
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. मग त्यात वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. मग त्यात बटाटे घालावेत. वरुन गरम पाणी घालून झाकून बटाटे अर्धवट शिजवून घ्यावेत. मग त्यात वांगी घालावीत. त्याचबरोबर हळद, तिखट, गोडा मसाला, धनेपूड जिरेपूड घालून नीट मिक्स करावे. जेवढा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात परत गरम पाणी घालावे व झाकून ठेवावे. अधनं मधनं झाकण काढून ढवळून घ्यावे. वांगी शिजत आली की त्यात मीठ, दाण्याचे कूट, गूळ व चिंचेचा कोळ घालून नीट मिक्स करावे. भाजी शिजली की वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
कांदा लसूण विरहित मटकीची उसळ
• Matakichi usal | मटकीची उसळ | Leena's Sug...
कांदा लसूण विरहित भरली वांगी
• Bharali vangi | भरली वांगी | Leena's Sugra...
कांदा लसूण विरहित गवार बटाटा भाजी
• एकदम सोप्पी गवार बटाटा भाजी | Leena's Sugr...
कांदा लसूण विरहित भरली तोंडली
• भरली तोंडली किंवा मसाला तोंडली, काहीही म्ह...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: