नांदेडमध्ये १० एकर ऊस जळून खाक, रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याचे २० लाखांचे नुकसान
Автор: City News Channel
Загружено: 2026-02-28
Просмотров: 364
Описание: नांदेड जिल्ह्यातील डोंगरगाव खुर्द येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी किरण सुरेशराव पेरके आणि पवन सुरेश पेरके यांच्या मालकीच्या सुमारे १० एकर उसाच्या शेताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आगीत उभा असलेला ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. तसेच ठिबक सिंचन पाईप आणि शेतीची अवजारेही जळाली, ज्यामुळे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मते शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून ही आग लावण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: