Dalai Lama vs China: Tibetan Buddhism की Golden Urn Method नव्या दलाई लामांच्या निवडीवरुन वाद का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-07-02
Просмотров: 28436
Описание:
#BolBhidu #DalaiLamaSuccessor #NewDalaiLama
दलाई लामा. तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि प्रमुख. सध्या तेन्झिन ग्यात्सो हे या पदावर विराजमान आहेत, जे बौद्ध धर्माचे १४वे दलाई लामा आहेत. ते १९४० पासून या पदावर आहेत. दलाई लामा येत्या ६ जुलैला वयाची ९० वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यादिवशी ते आपला उत्तराधिकारी म्हणजेच नवीन दलाई लामा कोण असतील, हे जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. बौद्ध धर्मात दलाई लामांच्या निवडीची प्रक्रिया खूप खास आहे. ही निवड एका विशिष्ट परंपरेद्वारे होते, जिचा संबंध पुनर्जन्माशी असतो. आता याच प्रक्रियेद्वारे पुढचे दलाई लामा निवडले जाणार आहेत. सध्याच्या दलाई लामांनी याची पुष्टी केली आहे. पण बौद्ध धर्माच्या या प्राचीन परंपरेला चीनचा विरोध आहे.
चीनच्या म्हणण्यानुसार, दलाई लामा निवडण्याचा अधिकार चीनकडं आहे. चीनची स्वत:ची एक परंपरा आहे. या परंपरेनुसारच पुढचे दलाई लामा निवडले जावेत, असं चीनचं म्हणणं आहे. यामुळं आता दलाई लामांच्या निवडीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार दलाई लामांची निवड कशी होते ? याला चीनचा विरोध का आहे? चीनची दलाई लामा निवडण्याची पद्धत काय आहे? सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: