#Simple
Автор: आरोग्योदय -The Spiritual AyuHealer.. Dr. Megha
Загружено: 2024-06-04
Просмотров: 184
Описание:
#healthy #cake
#recipe
आपल्याकडे केक सगळ्यांनाच आवडतो विशेष करून लहान मुलांना तर नक्की आवडतो परंतु केक मध्ये असणारे खूप जास्त केमिकल पोटात जाऊ नये असं वाटतं.
अशा वेळेस घरातील साध्या सोप्या आणि त्यातल्या त्यात आरोग्यदायी साहित्यांमध्ये जर केक बनवता आला तर...
तर घरातील गव्हाचे पीठ, गूळ ,दही आणि केळी या अगदी साध्या सोप्या साहित्यांमध्ये हा खरोखर चविष्ट केक बनतो.
गुळ ,दही, गव्हाचे पीठ हे सगळे वजन वाढवणारे पौष्टिक असे घटक असतात आणि हे आपल्या आहारात नेहमीच जात असतात परंतु कधीतरी केक खावासा वाटला आणि तो याच पदार्थांचा बनला तर कसा बनेल असे वाटू शकता तर हा नक्की खूप छान बनतो.
हा पचायला जड असतो म्हणून नेहमी नेहमी देऊ नये.
आणि सकाळच्या जास्तीच्या भूक मध्ये हा नक्की देऊ शकतात..
बरं गुळ आहे म्हणून हा चिकट बनतो असं नाही बर का..
तर नक्की बनवून बघा खाऊन पहा आणि कसा वाटला मला सांगा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: