मराठी ख्रिस्ती गीत | ख्रिस्ताचा अनुयायी २०२६
Автор: मराठी गॉस्पेल रिल्स
Загружено: 2026-01-12
Просмотров: 1949
Описание:
मराठी ख्रिस्ती गीत | ख्रिस्ताचा अनुयायी २०२६
देवबाप् तुम्हा सर्वांना आशीर्वाद देओ आमेन आणि आमेन 🙏
Chorus
जो कोणी ख्रिस्ताचा, अनुयायी होऊ पाहतो
त्याने आत्मत्याग करावा, येशू असे सांगतो ||
आपला वधस्तंभ उचलून, मागे त्याच्या चालावे
जीवनाचे सार्थक करण्या, प्रभू चरणी लीन व्हावे || 1 ||
Verse 1
जो आपला जीव वाचवील, तो त्याला मुकेल
जो ख्रिस्तासाठी अर्पिल, तोच तो मिळवील ||
सारे जग हे मिळवूनही, काय लाभ होणार?
जिवाचा जर नाश झाला, तर काय उरणार? || 2 ||
Verse 2
काय देऊ शकू मोबदला, आपल्या या जिवाचा?
महिमा केवळ प्रभूचा अन् मार्ग हा सत्याचा ||
ह्या पापी अन् व्यभिचारी, जगात नको लाज वाटू
प्रभूच्या पवित्र वचनाशी, नाते आपण घट्ट साटू || 3 ||
Chorus
जो कोणी ख्रिस्ताचा, अनुयायी होऊ पाहतो
त्याने आत्मत्याग करावा, येशू असे सांगतो ||
आपला वधस्तंभ उचलून, मागे त्याच्या चालावे
जीवनाचे सार्थक करण्या, प्रभू चरणी लीन व्हावे || 1 ||
Verse 3
जेव्हा येईल 'मनुष्याचा पुत्र', पित्याच्या गौरवात
पवित्र देवदूत येतील, त्याच्या सोबत थाटात ||
ज्याला लाज वाटली माझी, त्याची मलाही वाटेल
जो मजसाठी जगला, तोच मज प्रिय वाटेल || 4 ||
Chorus
जो कोणी ख्रिस्ताचा, अनुयायी होऊ पाहतो
त्याने आत्मत्याग करावा, येशू असे सांगतो ||
आपला वधस्तंभ उचलून, मागे त्याच्या चालावे
जीवनाचे सार्थक करण्या, प्रभू चरणी लीन व्हावे || 1 ||
✍️Song Written By Brother Vipul Manik Shinde
#marathibible #bibleversemarathi #christianmarathi #marathichristian #biblestudymarathi #marathibibleverse #मराठीबायबल #marathichristiansong #ख्रिस्तीभजन
#ChristianSongMarathi
#JesusMarathi
#MarathiWorship
#GospelMarathi
#ChristianMusic
#BhajanMarathi
#PraiseTheLord
#YeshuBhajan
#MarathiChristian
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: