Makar sankrant Song | तीळगुळ वाटूया गोडगोड बोलूया | sankranti Song | Tilgul Song L Jivan Pawar Song
Автор: Jivan media
Загружено: 2026-01-13
Просмотров: 19402
Описание:
Makar sankrant Song | तीळगुळ वाटूया गोडगोड बोलूया | sankranti Song | Tilgul Song L Jivan Pawar Song
मकर संक्रांतीच्या पावन सणानिमित्त सादर करतोय एक गोड, प्रेमळ आणि नात्यांना जोडणारं गीत — “तीळ गूळ वाटूया, गोड गोड बोलूया” 🌾💛
या गाण्यातून राग, रोष, द्वेष विसरून प्रेम, आपुलकी, माया आणि माणुसकी जपूया असा छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
तीळ गुळासारखा गोडवा आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि नात्यांत कायम राहो हीच सदिच्छा 🙏
हे गाणं आवडलं असेल तर — 👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमची प्रतिक्रिया लिहा
🔔 आणि आमचा चॅनल Subscribe करायला विसरू नका!
/ @jivaproduction
#makarsankranti
#sankranthi
#TilGul
#TilGulGhyaGodGodBola
#SankrantiSpecial
#SankrantiSong
#FestivalVibes
#IndianFestival
#makarsankranti
#tilgulghyagodgodbola
#jivaproduction
#jivanpawar
#jivanmedia
SONG:-तीळ गूळ🍀🍀💫
तीळ गूळ वाटूया, गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
संक्रांत आली, नात नात्याला जोडूया,
आपुलकी चा गोडवा, आपण जपूया |
❤️💫
हिरवी चोळी अंगी, नेसली काळी साडी
कपाळी लाल कुंकू, केसात मोगरा कळी,
सोडूया जूने वाद, ठेवा एकमेकात गोडी,
कटू उदगार नको, द्वेष्याची होळी करूया |
तीळ गूळ वाटूया, गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
❤️💫
तीळात गोडवा जसा, तसा मनात ठेऊ भाव,
नाते गोते मित्र परिवार, असो वा सारा गाव,
सासर माहेर एकत्र येऊ, हसत खेळत गाऊ,
संक्रांतीच्या या शुभदिनी, नवं नातं विणूया |
तीळ गूळ वाटूया , गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
❤️💫
उडती पतंग रंगीबेरंगी, आकाश झालं भारी,
हातात रंगीबेरंगी, बांगड्या खणखणती पोरी,
मन बी झालं हलकं, आज हरपली दुःख सारी
आज लहान मोठा, नाही कोणी, एक होऊया |
तीळ गूळ वाटूया , गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
❤️💫
सोनसळी ऊन अंगावरती, थंडीची झाली सांगता,
मनातली सगळी मैल, झटकून टाका ठेवा सभ्यता,
संक्रांतीच्या दिवशी, करा विचारांची सुंदरता,
नवं वर्ष, नवं स्वप्न, नवीच आशा जगवूया |
तीळ गूळ वाटूया, गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
❤️💫
तीळ गूळ वाटूया, गोड गोड बोलूया,
राग रोष विसरून, मन मोकळं करुया,
संक्रांत आली, नात नात्याला जोडूया,
आपुलकी चा गोडवा, आपण जपूया |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: