जुन्नरमधून 20 बिबट्यांचे गुजरातला स्थलांतर | मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी पाऊल
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-07
Просмотров: 151
Описание:
पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट्या संघर्षाच्या घटना वाढल्याने वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 20 बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर आणि शिरूर परिसरातील बिबट्यांना पकडून माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता 50 बिबट्यांपर्यंतच मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे भारतातील इतर संरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या स्थलांतरासाठी पशुवैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक सुरक्षेची सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
#Leopard #Junnar #Pune #Wildlife #HumanWildlifeConflict #ForestDepartment #Manikdoh #WildlifeConservation #Maharashtra #VanTara
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: