२०) देसकार रागात नोटेशन गड्यांनो राजा की रे झाला मो. ८१०८६६६८१०
Автор: रामेश्वर महाराज कुटे
Загружено: 2023-11-28
Просмотров: 9582
Описание:
व्हिडियो बघत बघत पेटी वाजवून भजन गायला शिका
गड्यांनो राजा की रे झाला bhajan with notation
Master the Art: Learning the Notation of Raag Kalawati in Simple Steps
गड्यांनो राजा की रे झाला या अभंगाचे काळी दोन पट्टीत तालबद्ध नोटेशन गुरुवर्य श्री. नामदेव महाराज पठाडे याना समर्पित
या चालीचे सर्व श्रेय मूळ गायक ह.भ.प.श्री.पंढरीनाथ आरुबाबा व त्यांचे सहकारी यांचे आहे.
गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥धृ॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्ही खेळु यमुने थडी ।
नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥१॥
खेळू हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी ।
आता चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥२॥
कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकासी ।
कडे घेऊ सावकासी । आता बहु भितो यासी ॥३॥
आम्ही तुम्ही सवे जाऊ । गाई वळावया जाऊ ।
त्याचे मानेत बुक्या देऊ । जवळी जावयासी भिऊ ॥४॥
नामा म्हणे चला जाऊ । हात जोडोनी उभे राहू ।
पाया पडून मागून घेऊ । जनीवनी तोचि कृष्णजी ध्याऊ ॥५॥
नोटेशन
सांसांसां रेंगं रेंसां धपध सासा गप पप धगप
गड्यांनो राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनी बैसला
पगधप गरेसा गप पप धगप पगधप गरेसा पधसांसांसांसां रेंगंरेंसां
कृsss ष्णss सिंहासनी बैसला । कृsss ष्णss सिंsहाsसनी बैsसला ॥धृ॥
सांसां सांसांसां रेंसांध सांधप पप धसां रेंपंगं रेंसां रेंसांधप
पांवा मोहरी घोंगडी ----- । आम्ही खेळु यमुने थडी -------
सांसां सांसांधप धगप धरें रेंरें रेंरें रेंसां सांरेंगंप गंरें सां
नाचा पाउलाs देहुडी ..... । कृष्ण आमुचाs किरेss गडी s ॥१॥
धसां रेंगं सांगंरें सांसांध धरें रेंरें रेंसां सांसांरेंगंप गंरेंसां
नामा म्हणे चलाs जाsऊ । हात जोडोनीs उभेsss राsहू
सांसां सांसांध पपप धगप धरें रेंरें रेंरें रेंसां गंपं गं रेंसां
पाया पडून मागून घेsऊ । ss जनीवनी तोचि कृष्णजी ध्याऊ ॥५॥
अनेकदा भजन कीर्तन भक्तीसंगीत ऐकल्यावर बहुतेकांना त्यातले संगीत समजावून घ्यावेसे वाटते, स्वतःला गाता वाजवता यावं अशी इच्छा होते. पण काही ना काही स्थावर जंगम अडथळे येतात. कधी गुरु भेटत नाही तर कधी गुरूला द्यायला जवळ दक्षिणा नसते, कधी वेळ भेटत नाही तर कधी समान अभिरुची असणारे जवळ कोणी नसते.
एनकेन कारणांनी शिकायचे राहून जाते. अशा हौशी लोकांना घरबसल्या आपला छंद जोपासता यावा यासाठी या च्यानेलवर भजनाचे ONSCREEN NOTATION उपलब्ध करून देत आहे. संपूर्ण व्हिडीओ पहा, आवडल्यास कमेंट करा, लाईक, शेअर व सबस्क्राइब करा.
मो. : ८१०८६६६८१० Before call whatsp plz
#bhajan #music #abhangmarathi #harmoniumbhajnan #harmoniumnotation #song
वारकरी चालींचे नोटेशन. स्वर काळी दोन . ताल भजनी ठेका. मध्यलय.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: