श्री दुर्गा सप्तशती अर्थासहित (चतुर्थोऽध्यायः संपूर्ण) | SHREE DURGA SAPTASHATI WITH MEANING
Автор: Kalpana Sathe
Загружено: 2026-02-08
Просмотров: 257
Описание:
श्री दुर्गा सप्तशती ही शक्ती उपासकांसाठी अनमोल साधना आहे. भगवतीचे चरित्र श्रवण करून, वारंवार पठण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. संस्कृत पठणासाठी विशिष्ट नियम आहेत आणि संथा घेणे आवश्यक आहे, तर प्राकृत पठणाला बंधन नाही. मात्र, दोन्ही प्रकारे पठण करताना कवच, अर्गला, कीलक यांचे पठण आणि शेवटी क्षमा प्रार्थना करणे आवश्यक आहे.
सलग १४ पाठ म्हणजे पाठात्मक नवचंडी, ज्यामुळे सर्व शुभ मनोकामना पूर्ण होतात. या स्तोत्रावर आधारीत चंडी होम हा एक प्रभावी याग आहे, जो नवरात्रात केल्यास वीरश्री जागृत होते. शक्ती उपासनेचे गूढ रहस्य म्हणजे – जिथे देव पराजित होतात, तिथे शक्ती विजय मिळवते, कारण ती शत्रूच्या तंत्रानेच लढते.
आजच्या काळात हिंदूंनी शक्तीचे तत्त्व आत्मसात करणे आवश्यक आहे. चंडी होम जिथे होतो, तिथे आवर्जून जावे, त्याचा अंगारा मस्तकी लावावा – हा सर्व प्रकारच्या बाधांवर प्रभावी उपाय आहे.
दुर्गा सप्तशती बाह्य आणि आंतरिक यज्ञ आहे. मधु-कैटभ, महिषासुर, शुंभ-निशुंभ ही आसुरी प्रवृत्ती आपल्या अंतरंगातही आहेत, आणि त्यांचा संहार करण्यासाठी या स्तोत्राचे पठण अत्यंत उपयुक्त आहे. सामान्य उपासकांसाठी बाह्य यज्ञ (पठण, होम) पुरेसा आहे, तर साधकांसाठी हा अंतर्यागसुद्धा महत्त्वाचा आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: