पाऊस उघडल्यावर कापूस फवारणी कोणती करावी // बोंड सड, पाते गळ, बोंड अळी, पांढरी माशी, थ्रीप्स व बोंड
Автор: Aapla Parivar Krushi Parivar
Загружено: 2021-09-23
Просмотров: 36554
Описание:
Title:- पाऊस उघडल्यावर कापूस फवारणी कोणती करावी // बोंड सड, पाते गळ, बोंड अळी, पांढरी माशी, थ्रीप्स व बोंड
शेतकरी मित्रांनो 20 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस चालू आहे त्या मुळे आपल्या कापूस पिकात अनेक समस्या दिसून येणारं आहे त्यामधे बोंड सड होणे, पाते गळ होणे, बोंड अळी , पांढरी माशी व थ्रीप्स..
शेतकरी मित्रांनो बोंड सड नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशक बद्दल माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे त्याच बरोबर कापूस पिकातील पाते गळ कमी करण्यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती दिली आहे..
1- कापूस बोंड सड होत असल्यास 15 लिटर पाण्यात 30 ग्राम Copper Oxychloride + 3 ग्राम Sterptocycline ची फवारणी करावी.
2- कापूस पाते गळ होत असल्यास 15 लिटर पाण्यात 4 मिली Planofix + 25 ग्राम बोरॉन फवारणी करावी.
3- बोंड अळी नियंत्रण करण्यासाठी अळीनाशक वापरावे.
4- कापूस पिकातील पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी 20 टक्के Acetamiprid म्हणजे व्यावपरी नाव टाटा माणिक किंव्हा धन प्रीत 12 ग्राम प्रती 15 लिटर पाण्यातून फवारावे.
5- कापूस पिकातील थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी Regent 40 मिली किंव्हा Bio R 303 25 मिली प्रती 15 लिटर पाण्यातून फवारावे.
6- कापूस बोंड लहान असल्यास 20 टक्के बोरॉन 25 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यातून फवारावे किंव्हा टॉनिक टाटा बहार 40 मिली प्रती 15 लिटर पाण्यातून फवारावे. धन्यवाद
#कापूस_पाचवी_फवारणी_कोणती_करावी
#बोंड_सड_नियत्रंण
#पाते_गळ_कमी_करणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: