ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पीठापुर मंदिरातील संपूर्ण पालखी सोहळा - जय जय गुरुदेव दत्त - Pithapur - Palkhi Sohala

Автор: Travel with Charu 👍

Загружено: 2024-01-13

Просмотров: 11263

Описание: अलौकिक असा सोहळा, नक्की पहा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा.

यात्रेचे आयोजक : S M Tours
सौ रुपाली देवरे आणि श्री प्रमोद देवरे
Mod : +91 9823606034 +91 8830885387

स्थान: इस्ट गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
विशेष: श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, कुकुटेश्वर मंदिर, अनघा लक्ष्मी मंदिर, सत्यनारायण मंदिर, पादुका: श्रीपाद पादुका

आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ (pithapuram) गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले “तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील.” हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.

या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला. तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता – पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल.

आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर (pithapuram) सोडले. हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर (pithapuram) हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे.

सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले.

तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तचीी स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत.

या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते.
#palkhisohla #sripadasrivallabha #dattaguru #dattatreya #pithapuram

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पीठापुर मंदिरातील संपूर्ण पालखी सोहळा - जय जय गुरुदेव दत्त - Pithapur  - Palkhi Sohala

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Pithapur Darshan - पिठापूर मंदिर - प्रसाद व्यवस्था - राहण्यासाठी उत्तम ठिकाण - भाग १  #pithapuram

Pithapur Darshan - पिठापूर मंदिर - प्रसाद व्यवस्था - राहण्यासाठी उत्तम ठिकाण - भाग १ #pithapuram

श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 149 संपर्क - 7020114739

श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 149 संपर्क - 7020114739

पिठापूर मंदिरातील अभिषेक आणि आमचा दत्त याग - Pithapur Abhishekh & Datta Yagya #yagya #abhishek

पिठापूर मंदिरातील अभिषेक आणि आमचा दत्त याग - Pithapur Abhishekh & Datta Yagya #yagya #abhishek

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

🚩भाग 1 श्रीमान रायगड दर्शन l संपूर्ण इतिहास l असे राजे पुन्हा होणे नाही#trekking #raigad #raigadfort

🚩भाग 1 श्रीमान रायगड दर्शन l संपूर्ण इतिहास l असे राजे पुन्हा होणे नाही#trekking #raigad #raigadfort

[7] श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी, कुरवपूर, तेलंगणा #devmajha #devmaza #देवमाझा DevMajha.com DevMaza.com

[7] श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी, कुरवपूर, तेलंगणा #devmajha #devmaza #देवमाझा DevMajha.com DevMaza.com

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचनाचे फायदे

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचनाचे फायदे

पीठापूर दर्शन I पीठापूर मधे असलेल्या महत्त्वाच्या मंदिरांची रंजक माहिती I Pithapur Hyderabad Jurney

पीठापूर दर्शन I पीठापूर मधे असलेल्या महत्त्वाच्या मंदिरांची रंजक माहिती I Pithapur Hyderabad Jurney

Мир замер, то что нашли в структуре Туринской Плащаницы шокировало всех…

Мир замер, то что нашли в структуре Туринской Плащаницы шокировало всех…

Mhalasa Devi Ustav 2025

Mhalasa Devi Ustav 2025

पिठापूर यात्रेतील माझा दैवी अनुभव आणि आलेली अनुभूती - Pithapur Yatra

पिठापूर यात्रेतील माझा दैवी अनुभव आणि आलेली अनुभूती - Pithapur Yatra

श्रीगुरुंची पालखी, नृसिंहवाडी (थोडक्यात)

श्रीगुरुंची पालखी, नृसिंहवाडी (थोडक्यात)

सोमनाथ यात्रा | Somnath Darshan | Ep-02 | Part-01 | Travel Vlog प्रवास सफर वर्णन

सोमनाथ यात्रा | Somnath Darshan | Ep-02 | Part-01 | Travel Vlog प्रवास सफर वर्णन

श्रीदत्त जयंती सोहळा २०२५  | चिरनेर व पानदिवे श्रीदत्त मंदिर | vlog no. 34 | Veduचेvlog's

श्रीदत्त जयंती सोहळा २०२५ | चिरनेर व पानदिवे श्रीदत्त मंदिर | vlog no. 34 | Veduचेvlog's

डोळे भरून येतील🥹..मन भरून जाईल 😭... हे दुर्मिळ दर्शन प्रत्येकानं एकदा पाहाच! संपूर्ण पीठापूर दर्शन |

डोळे भरून येतील🥹..मन भरून जाईल 😭... हे दुर्मिळ दर्शन प्रत्येकानं एकदा पाहाच! संपूर्ण पीठापूर दर्शन |

Shripad Shrivalbha Temple | Shree Kshetra Kuravpur Yatra | श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर

Shripad Shrivalbha Temple | Shree Kshetra Kuravpur Yatra | श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर

श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 167 संपर्क - 7020114739

श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 167 संपर्क - 7020114739

[12] श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी : बोटीने पंचपहाड तेलंगणा परतलो #devmajha #devmaza #देवमाझा DevMajha

[12] श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी : बोटीने पंचपहाड तेलंगणा परतलो #devmajha #devmaza #देवमाझा DevMajha

पिठापूर मधील प्राचीन मंदिरे व इथे राहण्याची सोय,भक्तनिवास|Pithapuram Full Vlog | Pithapur

पिठापूर मधील प्राचीन मंदिरे व इथे राहण्याची सोय,भक्तनिवास|Pithapuram Full Vlog | Pithapur

कुरवपूर दर्शन संपूर्ण माहिती|Kuravpur Darshan Information| पुणे ते कुरवपूर| श्रीपाद श्री वल्लभ|

कुरवपूर दर्शन संपूर्ण माहिती|Kuravpur Darshan Information| पुणे ते कुरवपूर| श्रीपाद श्री वल्लभ|

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]