पितृपक्ष विशेष मऊ दाटसर गव्हाची खीर |Gavhachi khir |Huggi Recipe |Wheat Kheer |Jalgoan Tadka Recipe
Автор: Jalgaon Tadka Recipe
Загружено: 2022-09-17
Просмотров: 198785
Описание:
नमस्कार,
Jalgoan Tadka Recipe मध्ये आपण गव्हाची खीर कशी तयार करायची ते बघणार आहोत..सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षांमध्ये गव्हाची खीर हि नैवेद्यासाठी बनवली जाते,गव्हाची खीर ही खांन्देशामध्ये अक्षय तृतीयेला ,बैल पोळ्याला, तसेच पितृपक्षाच्या काळात बनविली जाते ..तर या खीर साठी गहू कसा कांडावा..तो तुम्हाला जास्त काळ साठवायचा असेल तर तो कसा साठवायचा , गव्हाची खीर कशाप्रकारे करायची ही संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तसेच कृती दाखवलेली आहे..रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा.. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक 👍शेअर ..कमेंट्स करा.. चैनल वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा .😍.आणि शेजारी बेल 🔔आयकॉनवर प्रेस करा ..व ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील..
👉🏻साहित्य -
गहू - १ वाटि
पाणी - ३ वाट्या
गूड - १/२ वाटि
साखर - १/२ वाटी
खोबऱ्याचा कीस - १ ते २ चमचे
काजू बदाम चे काप - १ चमचा
वेलची जायफळ पूड - १/३ चमचा
थोडसं मीठ
गरम पाणी आवश्यकतेनुसार
Ingredients -
Wheat - 1 bowl
Water - 3 bowl
Jaggery - 1/2 bowl
Sugar - 1/2 bowl
Cardamon nutmeg powder - 1/3 tsp
Salt to taste
Hot Water as required
महत्त्वपूर्ण टिप्स-
👉गव्हाची खीर बनविण्यासाठी कुठलाही विशेष गहू न वापरताना जो तुमच्याकडे असेल तो गहू वापरून तुम्ही खीर अगदी आरामशीर बनवू शकता.. लोकवन, शरबती , चंदौसी,एम पी बोट, खपली गहू ,अगदि कुठलाही गहू तुम्ही खीर साठी घेऊ शकता...👈
Follow on Facebook
https://www.facebook.com/profile.php?...
१).गहू आधी पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात छान भिजत ठेवावा नंतर गहू ओला असतानाच मिक्सरमध्ये काढून घ्यावा म्हणजे गव्हाचा कोंडा छान निघून जातो..
२). मिक्सर सहा ते सात वेळा चालू बंद करत गहू मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा त्यामुळे कोंडा निघून जातो गव्हाचा पूर्ण चुरा होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
३). गहू कांडून झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा टॉवेलवर 25 ते 30 मिनिटे छान वाळवून घ्यावा म्हणजे वाढल्यामुळे गव्हाचा कोंडा लवकर निघून जातो...
४). कांडलेले हे गहू जर तुम्हाला जास्त काळ घरात साठवून ठेवायचे असतील तर गहू छान वाळवून हवा बंद डब्यामध्ये हे गहू तुम्ही साठवू शकता आणि हवी तेव्हा गव्हाचे खीर बनवू शकता..
५). गहू तीन ते सहा महिने तुम्ही साठवू शकता वर्षभर सुद्धा हा गहू साठवता येतो. परंतु, कांडलेला गहू कालांतराने जुना होतो. आणि त्याची खीर हवी तशी स्वादिष्ट लागत नाही, म्हणून तीन ते सहा महिने हा गहू आरामात तुम्ही घरात साठवू शकतात...
६). शक्यतोवर खीर दूध घालून शिजवू नये कारण ती लवकर खराब होते..
७). जर तुम्हाला दुधात शिजवलेली खीर हवीच असेल तर आवश्यक तेवढी खीर तुम्ही दुधामध्ये शिजवून खाऊ शकता. बाकीची खीर तुम्ही साखर किंवा गूळ न घालतांना फक्त शिजवलेला गहू एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.. त्यामुळे खीर दोन ते तीन दिवस चांगली राहते ..आणि हवी तेव्हा त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ घालून खीर बनवू शकता..
८). खिरसाठी ओला नारळ किंवा सुख किसलेलं खोबरं वापरू शकता कुठलेही ड्रायफ्रूट्स न वापरताना सुद्धा खिर स्वादिष्टच लागते.. त्यामुळे ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे...
#Pitrupakshrecipe
#Gavhachikheer
#HuggiRecipe
#JalgoanTadkaRecipe
#Pitrupakshathali
#pitrupakshnaivedyarecip
#WholewheatKheer
#KhandeshiRecipes
#Khandeshstylegahukheer
#Gahuchikheer
#पितृपक्षरेसिपी
#पितृपक्षनैवेद्यरेसिपी
#पितृपक्षथाळी
#गव्हाचीखीर
Please like,share, comments,abd subscribe to my channel and press bell 🔔icon to get mire recipe's
Thanks For Watching 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: