सोयाबीन वर होणारे कीड-रोग आणि त्यांचे उपाय | Soyabean keed vyavasthapan | keed niyantran | tan 2020
Автор: Krushi Ratna
Загружено: 2020-07-11
Просмотров: 1662
Описание:
#krushiratna
सोयाबीन वर होणारे कीड-रोग आणि त्यांचे उपाय | Soyabean pest and disease | soyabean keed vyavasthapan | soyabean keed niyantran | soyabean var honare rog 2020 | soyabin var honare rog | soyaben var honare rog | soyabin rog niyantran | soyabean khat niyojan | soyabean rog | soyabean khat niyojan | soyabean management | soyabin management 2020 | soyabean che rog | soyabean niyojan 2020 | soyabean tan niyojan | soyabean keed | soyabin ghate ali | soyabin pandhri mashi | soyabean khod mashi | soyabean ghate ali | soyabean keed upay | soyabin rog upay | soyabean tan nashak | soyabin tan nashak | soyabean keed nashak | soyabin varche tan nashak | soyabean kid niyantran | soyabean kid vyavasthapan | soyabin kid vyavasthapan | soyabin kid niyantran
किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून, पुढचे पंख तपकिरी रंगाचे, त्यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात. या पतंग किडीची मादी रात्रीच्या वेळी पानाच्या खालच्या बाजूस शिरेजवळ पुंजक्याने अंडी घालते. एक मादी पतंग जवळपास 2100 अंडी तीन ते चार पुंजक्यांत घालते. एका पुंजक्यात सुमारे 300 ते 600 अंडी असतात.
अंड्यातून दोन ते तीन दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. लहान अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या अळ्या हिरव्या असून, त्यांचे डोके काळे असते. अंड्यांतून बाहेर पडल्यानंतर अळ्या तीन ते पाच दिवस समूहाने राहतात. मोठ्या झाल्यानंतर (साधारणपणे तिसऱ्या व त्यापुढील अवस्था) विखरून एकएकट्या पाने खातात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढरी असते.
मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात. फुले व शेंगा लागल्यानंतर शिरादेखील खातात. अळी पाच वेळा कात टाकून 20 ते 22 दिवसांनी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
कोष लालसर तपकिरी असतात. कोषावस्था आठ ते दहा दिवसांची असते. किडीचा पूर्ण जीवनक्रम 31 ते 33 दिवसांत पूर्ण होतो. किडीचा पतंग व अळ्या दिवसा सूर्यप्रकाशाच्या वेळी जमिनीमध्ये, पानांखाली लपून राहतात व रात्री बाहेर निघतात. एका वर्षामध्ये या किडीच्या सहा ते आठ पिढ्या तयार होतात.
हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा (घाटे अळी) :
ही घाटे अळी किंवा अमेरिकन बोंड अळी म्हणूनही ओळखली जाते. अळीचा पतंग मजबूत बांध्याचा, फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. मादी पतंग कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंडी घुमटाच्या आकाराची पिवळसर असतात. तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते. पहिल्यांदा ती अंड्याचे कवच खाते, मगच पाने खाते.
पहिल्या अवस्थेतील अळी फिकट हिरवी असते व मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरीरावर दोन्ही कडांना तुटक गर्द करड्या रेषा असतात. अळी सुरवातीला पाने खाते. त्यानंतर कळ्या, फुले व शेंगांना नुकसान पोचविते. मोठ्या शेंगांना अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते.
नऊ ते 13 दिवसांनी कोषातून पतंग बाहेर पडतो. एक जीवनक्रम 31 ते 35 दिवसांमध्ये पूर्ण होतो.
पाने पोखरणारी अळी :
पूर्वी भुईमुगावर येणारी ही कीड सध्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करत आहे. पतंग निशाचर असून, रात्री प्रकाशाकडे आकर्षित होतात. मादी पतंग पानावर खालच्या किंवा वरच्या बाजूला अंडी घालते. अंडी चमकदार व पांढरी असतात.
दोन ते चार दिवसांनी अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. पूर्ण वाढ झालेली अळी मध्यम आकाराची व पाठीमागे निमुळती होत गेलेली असते. अळीचे शरीर हिरवट किंवा तपकिरी व डोके चमकदार काळ्या रंगाचे असते. सुरवातीला अळी पानाच्या वरच्या बाजूने पान पोखरून आत शिरते. आठवडाभर आत राहून बाहेर निघते व पानावर कप्पा बनवून त्यात राहते. यानंतर आजूबाजूची पाने एकमेकांना जोडून त्यामध्ये राहून उपजीविका करते.
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते. कोषावस्था चार ते सहा दिवसांत पूर्ण होऊन त्यातून पतंग बाहेर पडतो. पूर्ण जीवनक्रम 16 ते 22 दिवसांमध्ये पूर्ण होतो. भुईमूग, सोयाबीन पिकाशिवाय ही कीड बावची तणावर उपजीविका करते.
चक्री भुंगा
चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे 35 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. दोन्ही खापांच्या मध्ये खालच्या खापेजवळ तीन छिद्रे करते. मध्यभागाच्या छिद्रामधून आत अंडी घालते. अशा प्रकारे एक मादी एका जागी एक अशी जवळपास 78 अंडी घालते.
अंडी फिकट पिवळसर व लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंड्यातून अळी बाहेर निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाळतो.
चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात. त्या पूर्ण भरत नाहीत. पीक काढणीवेळी खापा केलेल्या जागेतून खोड तुटून पडते. त्यामुळेदेखील नुकसान होते. अळी 34 ते 38 दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात.
कोषातून आठ ते नऊ दिवसांनी प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. हे भुंगे अंडी देतात. अंड्यांतून अळ्या निघून पिकास नुकसान करतात. पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या सुप्तावस्थेत जातात. अशा प्रकारे चक्री भुंग्यांचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात. एका प्रकारामध्ये वर्षभरात एकच जीवनक्रम तर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन जीवनक्रम पार पडतात.
#krushiratna
Trizophos
Proclaim
Carbendazim
Clorantraniliprole
Diamethoate
Soyabean lagwad
Soyabean keed niyantran
Soyabean kid niyantran
Soyabean kid niyantran
Soyabean keed
soyabean keed vyavsathapan
soyabean tan niyantran
soyabin var honare rog in marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: