रामायणचार्य ह.भ.प. उद्धव महाराज चोले पांढरगाव येथील गाजलेले कीर्तन |
Автор: सोहळा चैतन्याचा / Sohala Chaitanyacha
Загружено: 2025-10-08
Просмотров: 617
Описание:
उद्धव महाराज चोले पांढरगाव येथील गाजलेले कीर्तन
क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |
नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |
संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।
---------------- संत तुकाराम महाराज
तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: