Thibak Sinchan Subsidy Yojana : मंडळी शेतीच्या क्षेत्रात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर .
Автор: BHARATSENA
Загружено: 2025-10-22
Просмотров: 11
Описание:
Thibak Sinchan Subsidy Yojana
Thibak Sinchan Subsidy Yojana : मंडळी शेतीच्या क्षेत्रात बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेमुळे पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर करणे आजच्या काळाची गरज आहे. याच उद्देशाने राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते, जेणेकरून कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवता येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात , असा भरा फॉर्म
या योजनेची मुख्य उद्दिष्टे कोणती?
या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे, कमी पाण्यात शेती करणं शक्य करणे आणि परिणामी उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. थोडक्यात सांगायचं झालं, तर एकेक थेंब महत्वाचा मानून त्यातून अधिकाधिक पीक घेतलं जावं, हीच या योजनेची खरी कल्पना आहे.
कोण लाभ घेऊ शकतात?
या योजनेचा लाभ सर्व खातेदार शेतकरी घेऊ शकतात. मात्र एक अट लक्षात घ्यावी लागेल ज्या शेतजमिनीवर मागील सात वर्षांत या योजनेचा लाभ घेतलेला नसेल, अशाच क्षेत्रासाठी शेतकरी पात्र ठरतील.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर , फक्त याच जिल्ह्याना मिळणार अनुदान
अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
1) शेतजमिनीचा ७/१२ आणि ८अ उतारा
2) जर शेतकरी अनुसूचित जाती (SC) किंवा जमाती (ST) वर्गातील असेल, तर संवर्ग प्रमाणपत्र
3) पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र (उदा. विहीर, नळ, बोअर इ.)
अनुदान किती मिळते?
सरकारकडून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ठराविक खर्चावर अनुदान दिलं जातं. अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ८०% पर्यंत तर इतर शेतकऱ्यांना ७५% पर्यंत अनुदान दिलं जातं.
या अनुदानात एक भाग प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत मिळतो (५५% किंवा ४५%), तर उर्वरित हिस्सा मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना पुरवते (२५% किंवा ३०%).
सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज
खर्च कसा ठरतो?
ठिबक सिंचन यंत्रणा लावण्यासाठी लागणारा खर्च शेतातल्या पिकांच्या अंतरावर आणि क्षेत्रफळावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ जर ठिबक टप्यांमधील अंतर १.२ मीटर बाय ०.६ मीटर असेल आणि शेतकरी १ हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज करत असेल, तर खर्च सुमारे ₹१,२७,५०० एवढा होतो. सरकारकडून या खर्चावर योग्य टक्केवारीत अनुदान दिलं जातं.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे https://mahadbtmahait.gov.in
अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ती कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवावीत.
अधिक माहिती कुठे मिळेल?
योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते तुम्हाला अर्ज प्रक्रियेसह इतर सर्व माहिती योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील.
पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा आहे. पाण्याच्या शाश्वत वापरातूनच समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी घडू शकतो. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती एका नव्या शेती संस्कृतीकडे नेणारी पायरी आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: