कूकर मध्ये भाकरीचे पीठ शिजवून तांदळाचे खिचा पापड l Tandalache khicha papad
Автор: Vidhya Shinde
Загружено: 2025-05-18
Просмотров: 675
Описание:
@vidhyashinde01
कूकर मध्ये भाकरीचे पीठ शिजवून तांदळाचे खिचा पापड l Tandalache khicha papad
नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते🙏
कसे आहात सगळे !
नक्की च बरे असणार,
आज आपण तांदळाचे लसुण आणि जीरा पापड बनवणार आहोत तुम्हाला जर घरच्या घरी काही तरी करायच असेल घरगूती आर्डर घ्यायच्या असतील तर हा आजचा व्हिडिओ फारच तुमच्या उपयोगी आहे. आज आपण भाकरीच्या पिठाचे कुकर मध्ये शिजवून पापड करणार आहोत तर पापड बनवण्यासाठी पिठ कसे तयार करायचे , पापड तुटू नये म्हणून काय करावे पिठ कस आणि किती वेळ शिजवावे पापड टेस्टी होण्यासाठी काय करावे कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही पापड करू शकता याची पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे . तसेच हे पापड तुम्ही घरी खाण्यासाठी बनवलेत तरी ते खूपच टेस्टी लागतात तुम्ही असे पापड बनवलेत तर ते डाळ भात बरोबर भाजी नसली तरी चालते नक्की पापड बनवून खाउन बघा आणि नंतर व्हिडिओ ला लाईक आणि शेअर करा 🙏
#vidhyashinde01
#कूकरमध्येभाकरीचेपीठशिजवूनतांदळाचेखिचापापड #Tandalachekhichapapad
#लसूणजीरापापड
#तांदळाचेपापड
#तांदळाचेखिचापापड
#मराठीरेसीपी
#Tandalachepapad
#tandalachekhichapapad
#tandalachepapadrecipe
#tandalachepapadinmarathi
#howtomaketandalachekhichapapad
#Howtomaketandalachepapad
#tandalachepalipapad
#tandalachevafevarachepapad
#Tandulachepapad
#treditionalrecipe
#viralvideo
#parmparikpadhtichetandalachepapad
#kokanirecipe
#tandalachepapadbyvidhya
#garlicpapad
aaj aapan tandalache lasun mirchi jira ghalun papad banavanar aahot he papadache pith aapan kukar madhye shijvnar aahot khayala khupch testi lagatat tumhi ase papad banale tar tumhala konatya bhaji chi garaj nahi dal bhat aani talalela papad farach chhan lagto tar video nakki bagha aani aavadla tar like share nakki kara 🙏
mala saport karanyaasathi
vidhya shinde 01 channel la Subscribe kara 🙏
Thank you for watching the video 👍👍👍
If you like the recipe, please like and comment
Friends, if you like the video, you can help the channel.
तांदळाच्या पापडाचे पिठ कसे तयार करावे
साहित्य
तांदूळ 2 किलो
कृती:
2 किलो तांदूळ सव्छ धूवून कपडयावर तीन ते चार दिवस सुकवून घेणे तांदूळ चांगले सुकले कि साफ करून घ्या आणि चक्की तून बारीक दळूण आणायच अशा प्रकारे आपले तांदळाच्या पापडाचे पिठ तयार झाले तुम्ही या पिठाची कुरडई ,जिरा पापड, पालक पापड ,तांदळाचे पळी पापड तांदळाचे वाफेवरचे पापड टोमॅटो पापड अशे वेगवेगळय़ा प्रकारचे पापड बनवू शकता.
तांदळाचे पापड
पापडाचे 2 कप
पाणी 3 कप (ज्या भांडयाने पिठ घ्या ल त्याच भांडयाणे पाणी घ्यावे )
हिरवी तिखट मिरची 5
लसूण पाकळ्या 10 ते 12
जीर 1/2 चमच
मिठ 1 /2 चमच चवीप्रमाणे
पापडखार 1/4 चमच
कृति
एका पसरट कढई मध्ये 3 बाऊल पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम झाल की मिरची ,लसूण याचा 2 चमचे ठेचा घाला सफेद तीळ आणि जीरा घाला पाण्याला उकळी आली की चांगल एखादे मिनिट शिजवून घ्या आणी गॅस मोठाच करून पिठ घाला. व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे मिक्स करा परत गॅस बारीक करून झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढा गॅस बंद करा आणी 10 मिनिट तसच पिठ झाकण ठेवा 10 मिनिटा नंतर व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे गरम गरम पिठ मळून घया पीठ मळून झाल की थोडं मळून छोटे छोटे गोळे करून कुकरच्या भांड्यात काढून घ्या आणि कुर्ला खाली पाणी घालून पिठाचा डब्बा कुकरमध्ये ठेवा व्हिडिओ त दाखवलेल्या प्रमाणे कुकरच्या चार शिटी करून घ्या गॅस मध्यम आचेवर ठेवा जर तुम्ही चाळणीत पीठ वाफवून घेणार असाल तर 20 ते 25 मीनीटे मिनिटे वाफवून घ्या गॅस बंद करा आणि दहा मिनिटानी पीठ मळून घ्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पापड बनवा .पापड घरी पण सूकतात नंतर एक ऊन लावा.
पापड बनवाण्यासाठी काहि टिप्स
1 तांदूळ चांगले सुकवा
2 तांदळाच्या पिठ बारीक काढा
3. पिठच्या दिडपट पाणी परफेक्ट प्रमाण
4. पिठ चांगल शिजवल पाहिजे नाहीतर पापड तुटतील
5. पिठ 10 ते 12 मिनिट मळा म्हणजे पापड तुटणार नाहीत
6. पिठ गरम गरम मळा म्हणजे गुठली कुठे असेल तर पटकन मोडते व पिठ मग लगेच नरम होते.
7. पापड बनवतांना तेलाचा कमीत कमी वापर करावा नाही तर पापड जास्त दिवस राहिले तर त्याला खोवट खराब वास येतो.
9. पापड चांगले सूकवावे नाहीतर बूरशी लागते .
10. पापड चांगले सूकले नाहीतर आंबट लागतात व आंबट वास येतो.
आजून काहि छान छान रेसीपी
होळी स्पेशल सूनबाईंच्या हातची चिकन थाळी
• होळी स्पेशल सूनबाईंच्या हातची चिकन थाळी l ...
कोवळ्या फणसाची भाजी /कुयरीची भाजी /फणस साफ करायची नविन पद्धत
• फणसाची भाजी lकुयरीची भाजी l fansachi bhaji...
मिक्सर, पाटा ,पूर्ण यंत्र काही ही न वापरता पूरण पोळी
• मिक्सर पाटा पूरणयंत्र चाळण न वापरता डाळ वा...
आंब्याची पूरणपोळी
• खास पद्धतीने लुसलुशीत आंब्याची पोळी l सोप्...
वर्षभरासाठी कैरी कशी साठवावी
• वर्षभरासाठी कैरी कशी साठवावी l कच्चा आंबा ...
उकडीचे तांदळाचे पापड
• Tandalache papad in marathi l तांदूळाच्या ...
साबूदाणा फेणी
• साबूदाणा पापड ।साबूदाणा फेणी lSago Papad ...
साबूदाणा पापड
• साबुदाणा पापड l How to make shabudana पापड...
फणसाची पूरणपोळी
• फणसाची पूरणपोळी l Fansachi puranpoli l Mah...
चिपळूण च्या रूममध्ये स्पेशल चिकन थाळी
• चिपळूणच्या किचन मध्ये स्पेशल चिकन थाळी l भ...
गर्मी तून जेवण बनवायचा कंटाळा आला तर बनवा असं एकच
• गर्मी तून जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर ...
फणसाच्या गऱ्यांची भाजी
• फणसाची गऱ्यांची भाजी l उकड गरे l Fansachi ...
पिकलेल्या आंब्या ची भाजी
• पिकलेल्या आंब्याची भाजी l आंब्याचा रायता l...
आंब्याचे मालपुवा
• आंब्याचे मालपोहे l मॅंगो मालपोहे l Mango ...
कोकणातील पारंपरिक घावणे
• कोकणातील पारंपरीक नाष्टा रेसिपी l घावणे l ...
बेळगावची उकड पोळी आणि आमरस
• बेळगावची उकड पोळी l पीठ पोळी l गवसणी रेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: